अल्लू अर्जुनच्या साधेपणानं जिंकली नेटकऱ्यांची मनं; पत्नीसोबत ढाब्यावर बसून केलं जेवण

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये तो त्याच्या पत्नीसोबत एका साध्या ढाब्यावर बसून जेवताना दिसतोय. त्याचा हा साधेपणा नेटकऱ्यांना खूपच आवडला असून फोटोवर ते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

अल्लू अर्जुनच्या साधेपणानं जिंकली नेटकऱ्यांची मनं; पत्नीसोबत ढाब्यावर बसून केलं जेवण
अल्लू अर्जुन आणि त्याची पत्नी स्नेहाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 12:29 PM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन हा खरंतर ‘स्टायलिश स्टार’ म्हणून ओळखला जातो. अल्लू अर्जुनची स्टाइल चाहत्यांना प्रचंड आवडते. मग ते चालण्या-बोलण्याची असो किंवा कपड्यांची. मात्र सध्या तो त्याच्या साधेपणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अल्लू अर्जुनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या पत्नीसोबत मिळून एका साध्या ढाब्यावर जेवताना दिसतोय. इतका मोठा स्टार असून कोणत्याही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये एसीमध्ये बसून जेवण्यापेक्षा अत्यंत साध्या ढाब्यावर जेवताना पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.

‘अल्लू अर्जुन आणि स्नेहा.. एका रस्त्याच्या कडेवरील ढाब्यावर दिसले. या व्यक्तीचा साधेपणा मन जिंकून घेतो’, असं लिहित एका युजरने हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दिसणारा ढाबा अत्यंत साधा आहे. तिथल्या टेबलाबर बसलेला अल्लू अर्जुन फोनवर बोलताना दिसतोय. त्याच्या बाजूला बसलेली पत्नी जेवताना दिसतेय. या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. ‘म्हणून बॉलिवूडपेक्षा साऊथचे कलाकार अधिक लोकप्रिय असतात’, असं एकाने लिहिलं. तर ‘इतक्या मोठ्या स्टारचा हा साधेपणा खरंच कौतुकास्पद आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द रुल’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘पुष्पा: द राइज’ला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या दुसऱ्या भागाविषयी खूप क्रेझ आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी काहीच मानधन घेतलेलं नाही. मध्यंतरी अशी जोरदार चर्चा होती की ‘पुष्पा’च्या यशानंतर अल्लू अर्जुनने त्याचं मानधन वाढवलंय. सीक्वेलसाठी तो खूप मोठी रक्कम स्वीकारणार असल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र नव्या अपडेटनुसार, अल्लू अर्जुनने ‘पुष्पा 2’साठी काहीच फी घेतली नाही. मात्र तरीसुद्धा अल्लू अर्जुन कोट्यवधी रुपयांत कमाई करणार आहे.

‘पुष्पा 2’मधील भूमिकेसाठी अल्लू अर्जुनने सध्या कोणतंच मानधन घेतलं नसलं तरी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या एकूण कमाईपैकी 33 टक्के भाग त्याला मिळणार आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास, जर या चित्रपटाने 1000 कोटी रुपयांचा गल्ला जमवला तर अल्लू अर्जुनला त्यापैकी 33 टक्के भाग मिळणार आहे. ‘पुष्पा 2’ हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा अधिक कमाई करणार असल्याचा विश्वास अल्लू अर्जुनला आहे. म्हणूनच त्याने निर्मात्यांसोबत ही वेगळी डील केली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.