‘जय अल्लू अर्जुन बोल तरच..’; साऊथ सुपरस्टारच्या चाहत्यांकडून व्यक्तीला बेदम मारहाण

बेंगळुरूमध्ये धक्कादायक घटना घडली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचे चाहते एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. या व्हिडीओवरून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

'जय अल्लू अर्जुन बोल तरच..'; साऊथ सुपरस्टारच्या चाहत्यांकडून व्यक्तीला बेदम मारहाण
अल्लू अर्जुनच्या चाहत्यांचा धक्कादायक व्हिडीओ समोरImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 11:33 AM

बेंगळुरू : 12 मार्च 2024 | आपल्या आवडत्या कलाकारांप्रती असलेलं चाहत्यांचं वेड अनेकदा भयानक रुप घेतं. असंच काहीसं बेंगळुरूमध्ये घडल्याचं पहायला मिळालं. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनचे चाहते एका व्यक्तीला बेंगळुरूमध्ये बेदम मारहाण करताना या व्हिडीओत दिसत आहे. संबंधित व्यक्तीला मारहाण करत असतानाच त्याला ‘जय अल्लू अर्जुन’ बोल अशी बळजबरीसुद्धा करत आहेत. तर दुसरीकडे पीडित व्यक्ती रक्तबंबाळ झाली असून त्याच्या चेहऱ्यावरही मार लागला आहे. बेंगळुरूमधील के. आर. पुरमजवळ ही घटना घडली आहे.

एका सोशल मीडिया युजरने एक्सवर (ट्विटर) हा व्हिडीओ पोस्ट केला असून बेंगळुरू पोलिसांनी संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्या व्यक्तीला नेमकं कशासाठी इतकं मारलं, यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र ज्या व्यक्तीला मारलं, तो ‘बाहुबली’ फेम प्रभासचा चाहता असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे साऊथच्या दोन सुपरस्टार्सच्या चाहत्यांमध्ये हा वाद झाल्याचा अंदाज आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

दरम्यान अल्लू अर्जुन हा त्याच्या आगामी ‘पुष्पा: द रुल’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटासाठी वैझागमध्ये शूटिंग करतोय. मंगळवारी त्याचा एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर समोर आला. ज्यामध्ये तो चाहत्यांची भेट घेताना दिसतोय. वैझागमध्ये अल्लू अर्जुनचं जल्लोषात स्वागत झालं. यावेळी चाहत्यांनी त्यावर फुलांचा वर्षाव केला. ‘पुष्पा 2’चं शूटिंग अखेरच्या टप्प्यात आलं आहे. चित्रपटातील ‘गंगमा तल्ली जत्रा’ सीन अत्यंत भव्य स्वरुपात शूट झाल्याची माहिती समोर येत आहे. 30 मिनिटांच्या या सीक्वेन्ससाठी तब्बल 35 दिवस शूटिंग करण्यात आली. या सीक्वेन्सच्या शूटिंगचा खर्च 50 कोटींच्या घरात झाला.

‘पुष्पा 2’ या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबतच रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्याही भूमिका आहेत. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तसुद्धा यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याचं कळतंय. मात्र याविषयी अद्याप चित्रपटाच्या टीमकडून दुजोरा मिळाला नाही.

सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा : द राईज’ हा चित्रपट डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. यामध्ये अल्लू अर्जुनसोबतच रश्मिक मंदाना आणि फहाद फासिल मुख्य भूमिकेत होते. अल्लू अर्जुनला ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’देखील मिळाला आहे. यानिमित्ताने अल्लू अर्जुन हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा पहिला तेलुगू अभिनेता ठरला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.