Pushpa 2: अल्लू अर्जुनचे चाहते उतरले रस्त्यावर; हातात पोस्टर, बॅनर घेऊन केली ‘ही’ मागणी

'पुष्पा 2'साठी चाहत्यांची बॅनरबाजी; रस्त्यावर उतरून केली मागणी

Pushpa 2: अल्लू अर्जुनचे चाहते उतरले रस्त्यावर; हातात पोस्टर, बॅनर घेऊन केली 'ही' मागणी
अल्लू अर्जुनच्या चाहत्यांकडून पुष्पा 2 च्या अपडेटची मागणीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 9:41 AM

मुंबई- ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर सध्या निर्माते आणि दिग्दर्शिक ‘पुष्पा: द रूल’ या सीक्वेलवर खूप मेहनत घेत आहेत. या महिन्यात सीक्वेलच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. मात्र जेव्हापासून या सीक्वेलची घोषणा झाली, तेव्हापासून चाहते चित्रपटाबाबत नवी अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. यासाठीच आता अभिनेता अल्लू अर्जुनचे चाहते चक्क रस्त्यावर उतरले आहेत. हातात बॅनर आणि पोस्टर घेऊन ते चित्रपटाच्या अपडेटची मागणी करत आहेत.

चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विटरवर काही फोटो पोस्ट केला आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ आणि युएई इथल्या चाहत्यांचे हे फोटो आहेत. हातात बॅनर घेऊन हे चाहते रस्त्यावर उभे आहेत आणि पुष्पाच्या सीक्वेलविषयी अपडेटची मागणी करत आहेत.

हे सुद्धा वाचा

‘पुष्पाच्या यशानंतर अल्लू अर्जुनचे चाहते आता सीक्वेलच्या अपडेट्ससाठी रस्त्यावर उतरले आहेत. चाहत्यांमधील ही उत्सुकता कमालीची आहे. याआधी अशा गोष्टी कधीच पहायला मिळाल्या नाहीत. त्यांच्या आवाजातील उत्सुकता स्पष्ट जाणवतेय’, असं त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलंय.

पुष्पा: द रुल या सीक्वेलमध्ये अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांच्यातील टक्कर पहायला मिळणार आहे. या दोघांसोबतच रश्मिका मंदानाचीही सीक्वेलमध्ये भूमिका आहे. गेल्या आठवड्यात या चित्रपटातील कलाकारांचा लूक टेस्ट करण्यात आला. सिनेमॅटोग्राफर मिरास्लो कुबा ब्रोझेक याने सोशल मीडियावर अल्लू अर्जुनचा फोटो शेअर केला होता.

ऑगस्टरमध्ये पूजा झाल्यानंतर पुष्पा 2 च्या प्रोजेक्टची सुरुवात झाली होती. दुसऱ्या भागाचं दिग्दर्शनसुद्धा सुकुमारच करणार आहे. मूळ तेलुगू भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत त्याचं डबिंग करण्यात आलं होतं. पाच विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा अल्लू अर्जुनचा पहिलाच चित्रपट होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.