‘पुष्पा २’ मधील Allu Arjun चा खास लूक आला समोर… पाहून तुमचा ही विश्वास बसणार नाही

‘पुष्पा राज... मैं झुकेगा नहीं...', 'पुष्पा २'मधील अभिनेत्याचा खास लूक सोशल मीडियावर व्हायरल, सर्वत्र अल्लू अर्जुन याच्या नव्या लूकचीच चर्चा..

'पुष्पा २'  मधील Allu Arjun चा खास लूक आला समोर... पाहून तुमचा ही विश्वास बसणार नाही
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 5:02 PM

मुंबई : ‘पुष्पा राज… मैं झुकेगा नहीं…’ या डायलॉगने अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. आता ‘पुष्पा 2 द रुल’ सिनेमाचा नवीन लूक जारी करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र अल्लू अर्जुन याचा नवा सिनेमा ‘पुष्पा २’ च्या चर्चा रंगत आहेत. नुकताच सिनेमाचा एक टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. टीझर प्रदर्शित करत ‘पुष्पा कुठे आहे?’ असा प्रश्न चाहत्यांना विचारण्यात आला. सध्या सर्वत्र अभिनेता अल्लू अर्जुन आणि ‘पुष्पा २’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

‘पुष्पा २’ सिनेमाच्या टीझर आणि अभिनेत्याचा सिनेमातील फर्स्ट लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहेत. टीझर प्रदर्शित होताच चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. आता सध्या अभिनेत्याच्या दमदार पोस्टरची चर्चा रंगली आहे. ज्यामध्ये अभिनेत्याला ओळखणं देखील कठीण आहे.

नुकताच पोस्ट करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये अभिनेत्याने साडी नेसली आहे. फक्त साडी नाही तर, अभिनेत्याने बांगड्या देखील भरल्या आहेत. शिवाय त्याच्या हातात एक बंदूक देखील आहे. अल्लू अर्जुनच्या या लूकला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या नव्या लूकची चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

पोस्टर ऑनलाईन शेअर केल्यानंतर चाहत्यांनी अभिनेत्याच्या नव्या लूकला भरभरून प्रेम दिलं. पोस्टर पाहता सिनेमा एका स्थानिक सणाच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचं समजते. फोटोमध्ये अभिनेत्यानं केलेला मेक-अप एखाद्या स्थानिक उत्सवातील कलाकृतीसारखा दिसत आहे. अल्लू अर्जुनच्या गळ्यात अनेक प्रकारच्या माळाही दिसतात.

अल्लू अर्जुन आज त्याचा 41 वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करत आहे. शिवाय अभिनेता आणि चाहते ‘पुष्पा २’ सिनेमासाठी प्रचंड उत्सुक आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. सिनेमात अल्लू अर्जुन याच्यासह अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

चाहत्यांच्या मनात ‘पुष्पा २’ सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘पुष्पा’ सिनेमाला चाहत्यांचं भरभरु प्रेम मिळालं. आता ‘पुष्पा २’ चाहत्यांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरणार की नाही? हे सिनेमाचा बॉक्स ठरवेल… (Allu Arjun Pushpa 2 The Rule Look)

‘पुष्पा’ आजही सिनेमातील अनेक डायलॉग चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे, पण ‘पुष्पा’ सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्याच्या लोकप्रियेत प्रचंड वाढ झाली आहे. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. आता चाहते ‘पुष्पा २’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.