Allu Arjun | ‘पुष्पा 2’च्या सेटवरील खास व्हिडीओ व्हायरल; अल्लू अर्जुनचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क!

राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर अल्लू अर्जुनने चाहत्यांसाठी एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओतून त्याने त्याच्या हैदराबादमधील घराची आणि 'पुष्पा 2'च्या सेटची झलक दाखवली आहे.

Allu Arjun | 'पुष्पा 2'च्या सेटवरील खास व्हिडीओ व्हायरल; अल्लू अर्जुनचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क!
Allu ArjunImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 2:01 PM

हैदराबाद | 30 ऑगस्ट 2023 : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला त्याच्या ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटासाठी नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ जाहीर झाला. यानिमित्ताने अल्लू अर्जुन हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा पहिला तेलुगू अभिनेता ठरला आहे. ‘पुष्पा 1’ हा चित्रपट डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता प्रेक्षकांना या चित्रपटाच्या सीक्वेलची प्रचंड उत्सुकता आहे. त्यापूर्वी अल्लू अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सना खास सरप्राइज दिला आहे. त्याने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून त्यात हैदराबादमधील त्याच्या घराची आणि ‘पुष्पा : द रूल’ या चित्रपटाच्या सेटवरची झलक दाखवली आहे. रामोजी फिल्म सिटीमध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे.

या व्हिडीओच्या सुरुवातीला अल्लू अर्जुन हैदराबादमधील त्याच्या घराची झलक दाखवतो. त्यात बरेचसे ट्रॉफी, अल्लू अर्जुनचं ऑफिस, स्विमिंग पूल, सोफ्यावरील ध्यानसाधनेची जागा आणि गार्डन एरिया पहायला मिळतो. “आज मी तुम्हाला पुष्पा 2 या चित्रपटाच्या सेटवर घेऊन जाणार आहे. पण त्यापूर्वी मी तुम्हाला माझं घर दाखवतो”, असं तो म्हणतो. कॉफी प्यायल्यानंतर तो रामोजी फिल्म सिटीकडे रवाना होतो. प्रवासादरम्यान तो त्याच्या कुटुंबीयांना व्हिडीओ कॉल करतो, तेव्हा त्याची दोन मुलं त्याच्याशी बोलतात. “हे दोघांभोवती माझं विश्व फिरतं”, अशा शब्दांत अल्लू अर्जुन व्यक्त होतो.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Instagram (@instagram)

फिल्म सिटीमधील सेटवर पोहोचताच असंख्य चाहते अल्लू अर्जुनची प्रतीक्षा करताना दिसतात. त्या चाहत्यांना अभिवादन केल्यानंतर तो व्हॅनिटी व्हॅनमध्ये तयारीसाठी जातो. शूटिंगचे कपडे आणि कुऱ्हाड निवडल्यानंतर तो मेकअपसाठी बसतो. अल्लू अर्जुनचं पुष्पामध्ये ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं, हेसुद्धा या व्हिडीओत पहायला मिळतं. त्यानंतर शूटिंगला सुरुवात होते आणि तो काही ॲक्शन सीन्स शूट करताना दिसतो. या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर आतापर्यंत 11 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज आणि जवळपास 2 दशलक्ष लाइक्स मिळाले आहेत.

अल्लू अर्जुनशिवाय देवी श्रीप्रसाद यांनाही ‘पुष्पा : द राईज’मधील संगीतासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. श्रीवल्ली, ऊ अंटावा, सामी सामी ही या चित्रपटातील गाणी तुफान गाजली. आजही त्या गाण्यांची तुफान क्रेझ पहायला मिळते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.