Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याची हत्या? दिग्दर्शकाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सर्वत्र खळबळ

alphonse puthren | प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचं निधन की हत्या? दिग्दर्शकाच्या सोशल मीडिया पोस्टमधून केलाय धक्कादायक दावा... सध्या सर्वत्र प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या मृत्यूची आणि दिग्दर्शकाच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा...

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याची हत्या? दिग्दर्शकाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सर्वत्र खळबळ
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 10:07 AM

मुंबई | 29 डिसेंबर 2023 : देसिया मुरपोक्कू द्रविड कळघमचे (डीएमडीके) संस्थापक आणि अभिनेते विजयकांत यांचं निधन झाल्याची माहिती गुरुवारी समोर आली. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण आता विजयकांत यांच्या निधनाबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. विजयकांत यांचं निधन झालं नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे… असा दावा दिग्दर्शक अल्फोंस पुथ्रेन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

उदयनिधि स्टालिन यांचा उल्लेख करत दिग्दर्शकाने धक्कादायक दावा केला आहे. दिग्दर्शक अल्फोंस पुथ्रेन म्हणाले, ‘इंडस्ट्रीच्या दिग्गज आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललीता आणि एम.करुणानिधी यांची हत्या करण्यात आली. ‘इंडियन 2’ च्या सेटवर कमल हासन आणि तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना मारण्याचा प्रयत्न केला. मारेकऱ्यांचे पुढील लक्ष्य एमके स्टॅलिन किंवा उदयनिधी स्टॅलिन असल्याचंही पुथ्रेन म्हणाले.. असे धक्कादायक दावे करत पुथ्रेन यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

अल्फोंस पुथ्रेन पुढे म्हणाले, ‘जर तुम्ही आता गुन्हेगारांचा शोध घेणार नाहीत, तर गुन्हेगारांच्या निशाण्यावर तुम्ही असाल… नेरम सुपरहिट होण्यासाठी तुम्ही मला भेट दिली होती… हे मला आठवत आहे. तुम्ही आयफोन सेंटरला कॉल केला आणि मला काळ्या रंगाचा आयफोन भेट म्हणून दिला. तुम्हाला उदयनिधी अण्णा आठवतील अशी आशा आहे. तुमच्यासाठी गुन्हेगार आणि त्यांचा हेतू शोधणं सोपं आहे. दिग्दर्शकाची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कोरोनामुळे अभिनेते विजयकांत यांचं कोरोनामुळे निधन झाल्याची चर्चा…

अभिनेते विजयकांत यांच्या कोव्हिड चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली होती. एवढंच नाही तर, त्यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात असं देखील सांगण्यात आलं होतं. त्यांच्या निधनावर सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. पण आता अल्फोंस पुथ्रेन यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.