हार्दिकच्या पूर्व पत्नीसोबत ब्रेकअप का केलं? बऱ्याच वर्षांनंतर अली गोणीने सोडलं मौन

क्रिकेटर हार्दिक पांड्याच्या आधी मॉडेल नताशा स्टँकोविक ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता अली गोणीला डेट करत होती. या दोघांनी एकत्र एका शोमध्येही भाग घेतला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अलीने ब्रेकअपचं कारण सांगितलं आहे.

हार्दिकच्या पूर्व पत्नीसोबत ब्रेकअप का केलं? बऱ्याच वर्षांनंतर अली गोणीने सोडलं मौन
नताशा स्टँकोविक, अली गोणी, हार्दिक पांड्याImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 9:46 AM

मॉडेल नताशा स्टँकोविकने क्रिकेटर हार्दिक पांड्याला घटस्फोट दिला आहे. घटस्फोटानंतर ती मुलासोबत तिच्या मायदेशी निघून गेली. मात्र सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असून तिथून विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करतेय. हार्दिकसोबतच्या घटस्फोटानंतर नताशाचे भूतकाळातील रिलेशनशिपसुद्धा चर्चेत आले आहेत. हार्दिकच्या आधी ती टीव्ही अभिनेता अली गोणीला डेट करत होती. या दोघांनी ‘नच बलिए’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये एकत्र भाग घेतला होता. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं. या नात्यावर आणि ब्रेकअपवर अखेर अलीने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नताशासोबतच्या नात्याबद्दल अली मोकळेपणे व्यक्त झाला.

अली गोणीने कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत दोघांनी अलीला त्याच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. अली सध्या अभिनेत्री जास्मीन भसीनला डेट करतोय. तिच्यासोबतच्या नात्याविषयी तो म्हणाला, “जास्मीन आणि तिच्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत माझं खूप चांगलं नातं आहे. ती तिच्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवते. तिच्या कुटुंबात लहानांपासून मोठ्यांपर्यंत ती प्रत्येकाची आवडती आहे.”

हे सुद्धा वाचा

यावेळी अली त्याच्या भूतकाळातील रिलेशनशिपबद्दल म्हणाला, “जास्मीनच्या आधी माझं नातं फार काळ यासाठी टिकू शकलं नव्हतं कारण तिच्या मागण्या खूप होत्या. तिच्या मागण्यांना मी स्वीकारू करू शकलो नाही. तिने अट ठेवली होती की लग्नानंतर ती माझ्या कुटुंबीयांसोबत राहणार नाही आणि मला कोणत्याही परिस्थितीत कुटुंबीयांना सोडायचं नव्हतं. म्हणूनच आमचं नातं टिकू शकलं नाही.” यावेळी अलीने स्पष्टपणे नताशाचं नाव घेतलं नाही, पण तो तिच्याचबद्दल बोलत होता, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. कारण जास्मीनच्या आधी अली नताशालाच डेट करत होता. “मी माझ्या कुटुंबाला सोडू शकत नाही. मी त्यांच्यासोबतच राहतोय आणि यापुढेही राहणार आहे. या जगातील कोणतीही शक्ती मला त्यांच्यापासून वेगळं करू शकत नाही”, असंही त्याने स्पष्ट केलं.

‘बिग बॉस’च्या चौदाव्या सिझनमध्ये जास्मिन आणि अली गोणी हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. तेव्हापासून दोघं एकमेकांना डेट करू लागले. एका मुलाखतीत अलीने जास्मिनसोबतच्या लग्नाची हिंटसुद्धा दिली होती. ‘इन्स्टंट बॉलिवूड’ला दिलेल्या मुलाखतीत अलीला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “आई म्हणतेय की आता लग्न कर. जास्मिन लग्नासाठी तयार आहे. मीसुद्धा तयार आहे. कदाचित तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी कळेल.”

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.