काजोल हिच्यासोबत किसिंग सीन अभिनेत्याला पडला महागात? मुलगी म्हणाली, ‘लाजिरवणी गोष्ट…’
Kissing scene with Kajol | काजोल हिच्यासोबत किसिंग सीन, कशी होती अभिनेत्याच्या पत्नी आणि मुलीची प्रतिक्रिया, अभिनेत्याकडून मोठा खुलासा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा...
पाकिस्तानी अभिनेता अली खान त्याच्या दमदार अभिनयामुळे ओळखला जातो. दमदार अभिनयामुळे अभिनेत्याला फक्त बॉलिवूड नाहीतर, हॉलिवूडमध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली. अली खान याने ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी देखील काम केलं आहे. अली याने अभिनेत्री काजोल हिच्यासोबत ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. क्राईम थ्रिलर सीरिज ‘द ट्रायल’ला प्रेक्षकांकडून देखील पसंती मिळाली. या सीरिजमध्ये अली खान आणि काजोल यांचा किसिंग सीन देखील आहे. अभिनेत्रीचा किसिंग सीन पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. आता काजोल हिच्यासोबत दिलेल्या किसिंग सीनवर अभिनेत्याच्या मुलीची आणि पत्नीची प्रतिक्रिया समोर येत आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अली खान याने किसिंग सीनबद्दल मोठा खुलासा केला आहे. मुलाखतीत अभिनेता त्याच्या सिनेमांबद्दल बोलला. तसेच द ट्रायलमधील काजोलसोबत दिलेल्या किसिंग सीनवर कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय होती हेही सांगितले.
किसिंग सीनवर मुलांची प्रतिक्रिया काय असते? या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेता म्हणाला, ‘मुलं माझे सिनेमे पाहात नाहीत. पण जर मी सांगितलं सिनेमा पाहा, तर ते पाहतात.’ पुढे किसिंग सीनबद्दल अभिनेता म्हणाला, ‘रिहर्सल केल्याशिवाय कोणती गोष्ट होत नाही हे सत्य आहे. रिहर्सल म्हणजे एकमेकांना किस करणं होतं नाही. त्या प्रोजेक्टमध्ये जेवढी लोकं आहेत, ती सीनच्या वेळी सेटवर एकत्र नकोत…’ असं देखील अभिनेता म्हणाला…
‘द ट्रायल’ सिनेमात किसिंग सीन पाहिल्यानंतर पत्नी आणि मुलीचा काय प्रतिक्रिया होती? या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेता म्हणाला, ‘सीरिज प्रदर्शित झाली तेव्हा आम्ही थायलँड येथे होतो. आम्ही एपिसोड एकत्र पाहात होतो. चांदनी माझ्या बाजूला बसली होती. सोफ्यावर माझी 15 वर्षांची मुलगी बसली होती.’
‘तेव्हा किसिंग सीन आला. आम्ही सीन पाहिला. सीन पाहिल्यानंतर मला एवढा अभिमान वाटला की कोणीही भुवया उंचावल्या नाहीत. यात कोणती लाजिरवाणी गोष्ट आहे असं पत्नी आणि मुलीला वाटलं नाही. मुलीला वाटले की हे आपल्या वडिलांचे काम आहे.’ असं देखील अभिनेता अली खान म्हणाला आहे.