Gadar 2 | ‘तिच्या अश्लील व्हिडीओचा ट्विट…’, अमिषा पटेल हिचे दिग्दर्शकावर गंभीर आरोप

Gadar 2 | नुकताच घडलेल्या 'त्या' घटनेवर अमिषा पटेल हिने सोडलं मौन, अभिनेत्रीने अश्लील व्हिडीओचा उल्लेख करक 'गदर 2' सिनेमाच्या दिग्दर्शकावर साधला निशाणा..

Gadar 2 | 'तिच्या अश्लील व्हिडीओचा ट्विट...', अमिषा पटेल हिचे दिग्दर्शकावर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 8:07 AM

मुंबई : 5 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री अमिषा पटेल गेल्या काही दिवसांपासून ‘गदर 2’ सिनेमामुळे चर्चेत आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने चाहत्यांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर राज्य केलं आहे. सिनेमा 500 कोटी रुपयांच्या क्लब हाऊसमध्ये सामील झाला आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये ‘गदर 2’ सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे सिनेमा बॉक्स ऑफिसमुळे चर्चेत आहे, तर दुसरीकडे अमिषा पटेल हिच्या धक्कादायक वक्तव्यांमुळे… आता देखील अभिनेत्री आणि ‘गदर 2’ सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरु आहे. अमिषा सतत अनिल शर्मा यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत अमिषा पटेल म्हणाली, ‘अनेक जण मला अनिल शर्मा यांच्यासोबत असलेल्या माझ्या नात्याबद्दल विचारत असतात. ‘गदर – एक प्रेम कथा’ दरम्यान आमचे संबंध चांगले नव्हते, पण ते कायम माझ्यासाठी एक कुटुंब आहेत आणि राहतील. कुटुंबातील काही सदस्यांसोबत आपण एकत्र राहत नाही. पण ते आपलं कुटुंब असतात. आमच्यामध्ये देखील असंच नातं आहे…’

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘क्रूचे पैसे थकवले असताना जे ट्विट करण्यात आले होते, ते अनिल शर्मा यांनी डिलिट केलं. पुरावा म्हणून माझ्याकडे संबंधीत चॅट आहेत. शिवाय सिमरत कौर हिचा ट्वीट ज्यामध्ये तिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता… ‘ असं वक्तव्य अभिनेत्रीने केलं.. सिमरत कौर हिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती.

‘माझा बॉलिवूडमध्ये कोणी गॉडफादर नाही…’

बॉलिवूडमध्ये आलेल्या अपयशाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘बॉक्स ऑफिसवर माझे सिनेमा फ्लॉप होत असताना मला टार्गेट केलं जात होतं. कोणीही मला पाठिंबा दिला नाही. माझं कुटुंब बॉलिवूडमधील असतं आणि माझा कोणी गॉडफादर असता तर मला अनेक संकटांचा सामना करावा लागला नसता..’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझे सिनेमा हीट झाले नसते तरी मला सन्मान मिळाला असता. पण जे झालं ते योग्य झालं. मी फक्त ब्लॉकबस्टर सिनेमांसाठी बनली आहे…’ असं म्हणत अभिनेत्रीने खंत व्यक्त केली. सध्या फक्त आणि फक्त अमिषा पटेल आणि तिच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.