Ameesha Patel | ‘गदर’नंतर अमीषाने स्वत:च्या आईवडिलांवर केले होते गंभीर आरोप; कोर्टापर्यंत पोहोचलं होतं प्रकरण

अमीषा पटेल आणि दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्यातील जवळीकसुद्धा चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतींमध्ये अमीषाने स्पष्ट केलं होतं की विक्रम भट्टसोबतच्या नात्यामुळे तिच्या करिअरवर वाईट परिणाम झाला होता.

Ameesha Patel | 'गदर'नंतर अमीषाने स्वत:च्या आईवडिलांवर केले होते गंभीर आरोप; कोर्टापर्यंत पोहोचलं होतं प्रकरण
Ameesha PatelImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 9:39 AM

मुंबई | 8 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री अमीषा पटेल बऱ्याच वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. आगामी ‘गदर 2’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 22 वर्षांनंतर सनी देओल आणि अमीषाची जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे. या चित्रपटामुळे अमीषाचा तिच्या कुटुंबीयांसोबतचा जुना वाद चर्चेत आला आहे. अमीषाला करिअरच्या सुरुवातीलाच दोन मोठ्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. हृतिक रोशनसोबतचा ‘कहो ना प्यार है’ हा तिचा पहिलाच चित्रपट तुफान हिट ठरला होता. त्यानंतर ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने इतिहास रचला. करिअरच्या सुरुवातीलाच अमीषाचं तिच्या आई-वडिलांसोबत जोरदार भांडण झालं.

नेमकं काय आहे प्रकरण?

पहिल्या दोन चित्रपटांच्या जबरदस्त यशानंतर अमीषा पटेलचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला. हे प्रकरण इतकं वाढलं की अभिनेत्रीला कोर्टाची पायरी चढावी लागली होती. तिने सार्वजनिकरित्या तिच्या आईवडिलांवर आरोप केला होता की तिने कमावलेल्या पैशांचा ते गैरवापर करत आहेत. तर दुसरीकडे अमीषाच्या आईवडिलांनी हे आरोप फेटाळले होते. अमीषाने तिच्या आईवडिलांवर 12 कोटी रुपये हडपल्याचा आरोप केला होता.

दिग्दर्शक विक्रम भट्टसोबत अमीषाची जवळीक

अमीषा पटेल आणि दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्यातील जवळीकसुद्धा चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतींमध्ये अमीषाने स्पष्ट केलं होतं की विक्रम भट्टसोबतच्या नात्यामुळे तिच्या करिअरवर वाईट परिणाम झाला होता. अमीषा आणि विक्रम हे जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट करत होते. अभिनेत्री सुष्मिता सेनशी ब्रेकअप झाल्यानंतर विक्रम भट्टने अमीषाला डेट करण्यास सुरुवात केली. 2006 मध्ये ‘आँखे’ या चित्रपटात काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या विक्रमच्या 1920 या चित्रपटानंतर दोघांचं ब्रेकअप झालं.

हे सुद्धा वाचा

या नात्याविषयी बोलताना अमीषा म्हणाली, “या इंडस्ट्रीत प्रामाणिकपणाला कोणतीच जागा नाही आणि मी सर्वांत प्रामाणिक व्यक्ती आहे. माझ्या मनात जे असतं तेच माझ्या चेहऱ्यावर दिसतं. पण हाच माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा ड्रॉबॅक ठरला आहे. निश्चितपणे मी फक्त ज्या दोन रिलेशनशिप्समध्ये होती आणि ज्याविषयी मी जाहीरपणे व्यक्त झाले, त्यांचाच माझ्या करिअरला मोठा फटका बसला. आता गेल्या 12-13 वर्षांपासून माझ्या आयुष्यात कोणीच नाही. फक्त शांतता आहे. मला माझ्या आयुष्यात दुसरं काहीच नकोय.”

छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.