अमीषा पटेल हिने केली चक्क करीना कपूर हिची पोलखोल, कशाप्रकारे दाखवण्यात आला चित्रपटातून बाहेरचा रस्ता, मोठा खुलासा
अमीषा पटेल ही सध्या तिच्या गदर 2 या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट अनेक रेकाॅर्ड तोडताना दिसतोय. अमीषा पटेल ही देखील या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अमीषा पटेल हिने नुकताच थेट करीना कपूर खान हिच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
मुंबई : अमीषा पटेल हिचा गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. गदर 2 चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड ब्रेक केले. गदर 2 चित्रपटाच्या माध्यमातून अमीषा पटेल हिने मोठ्या काळानंतर बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. गदर 2 हा चित्रपट (Movie) धमाका करतोय. नुकताच मुंबईमध्ये गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले. यावेळी बाॅलिवूडच्या सर्वच स्टारने हजेरी लावली. गदर 2 चित्रपटाचे प्रमोशन सनी देओल (Sunny Deol) याच्यासोबत अमीषा पटेलही करताना दिसली.
नुकताच अमीषा पटेल हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये अत्यंत मोठे खुलासे करताना अमीषा पटेल ही दिसली आहे. विशेष म्हणजे चक्क अमीषा पटेल हिने करीना कपूर खान हिच्याबद्दल खुलासा केला आहे. अमीषा पटेल म्हणाली की, मुळात म्हणजे कहो ना प्यार है या चित्रपटामध्ये माझ्या अगोदर करीना कपूर हिला साईन करण्यात आले होते.
कहो ना प्यार है या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरूवात करण्यात आली. ऋतिक रोशन या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये डेब्यू करणार होता. चित्रपटाची शूटिंग सुरू झाल्यानंतर अचानकपणे राकेश रोशन यांनी चित्रपटाची शूटिंग बंद केली. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्क बसला. कारण राकेश रोशन आणि करीना कपूर यांच्यामध्ये काही गोष्टी अजिबात जमत नव्हत्या.
शेवटी राकेश रोशन यांनी चित्रपटाची शूटिंग बंद करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटासाठी राकेश रोशन यांनी मोठा पैसा लावला होता. चित्रपटाची शूटिंग बंद झाल्याने नेमके काय करावे हेच राकेश रोशन यांना सुचत नव्हते. ते टेन्शनमध्ये होते. एका पार्टीमध्ये त्यांना अमिषा पटेल ही दिसली आणि हिच आपल्या चित्रपटाची अभिनेत्री बेस्ट होऊ शकते त्यांना वाटले.
पुढे अमीषा पटेल म्हणाली की, पिंकी आंटी (राकेश रोशन यांच्या पत्नी) यांनी याबद्दल मला सांगितले. विशेष म्हणजे अमीषा पटेल आणि ऋतिक रोशन यांचा पहिलाच कहो ना प्यार है हा चित्रपट सुपरहिट ठरला. प्रेक्षकांनी ऋतिक रोशन आणि अमीषा पटेल यांच्या जोडीला डोक्यावर घेतले आणि चित्रपटाने मोठी धमाल केली.
अमीषा पटेल ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसते. आपल्या फिटनेसकडेही अमीषा पटेल लक्ष देते. अमीषा पटेल हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. अमीषा पटेल अजून काही मोठ्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका करण्याची दाट शक्यता आहे. अमीषा पटेल हिच्याकडे बऱ्याच चित्रपटाच्या आॅफर आल्याचे सांगितले जात आहे.