Ameesha Patel | ‘तू आता रिटायर हो’, ‘गदर’च्या यशानंतर संजय लीला भन्साळींनी अमीषाला का दिला असा सल्ला?

आणखी एका मुलाखतीत अमीषाने तिला ऑफर केलेल्या काही चित्रपटांचीही नावं घेतली. शाहरुख खानच्या 'चलते चलते', सलमान खानच्या 'तेरे नाम' आणि संजय दत्तच्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' यांसारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकांचे ऑफर्स मिळाल्याचं तिने सांगितलं.

Ameesha Patel | 'तू आता रिटायर हो', 'गदर'च्या यशानंतर संजय लीला भन्साळींनी अमीषाला का दिला असा सल्ला?
'गदर'च्या तुफान यशानंतर भन्साळींनी अमीषाला दिला होता अजब सल्लाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 8:44 AM

मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री अमीषा पटेल सध्या ‘गदर 2’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. पहिला भागसुद्धा त्यावेळी तुफान हिट ठरला होता. त्यातही अमीषा पटेलने अभिनेता सनी देओलसोबत मुख्य भूमिका साकारली होती. अमीषाने हृतिक रोशनसोबत ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. करिअरमधील पहिलावहिला चित्रपट जबरदस्त गाजल्यानंतर काही काळानेच अमीषाचा ‘गदर’ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या दोन्ही चित्रपटांमुळे अमीषा यशाच्या शिखरावर होती. त्यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी तिला पत्र लिहिलं होतं. या पत्राविषयी तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

भन्साळींनी लिहिलं होतं पत्र

“गदर पाहिल्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी मला खूप सुंदर पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं होतं. त्यानंतर मी जेव्हा त्यांना भेटले, तेव्हा ते मला म्हणाले, ‘अमीषा, तू आता निवृत्त झाली पाहिजे.’ ते असं का बोलतायत असा मला प्रश्न पडला होता. मला काहीच समजत नव्हतं”, असं अमीषाने सांगितलं.

काय म्हणाले होते भन्साळी?

याविषयी ती पुढे म्हणाली, “तू या दोन चित्रपटांमधूनच एवढं यश मिळवलंस जे काही कलाकार त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये मिळवत नाहीत, असं ते मला म्हणाले. आयुष्यात एकदाच मुघल-ए-आझम, मदर इंडिया, पाकिझा, शोले यांसारखे चित्रपट बनवले जातात. तुझ्या आयुष्यातला दुसराच चित्रपट इतका हिट ठरला आहे. आता पुढे काय करशील?, असा सवाल त्यांनी मला केला.”

हे सुद्धा वाचा

अमीषाने नाकारले मोठे चित्रपट

त्यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीत नवीनच असल्याने भन्साळींना नेमकं काय म्हणायचं होतं हे समजलं नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. कहो ना प्यार है आणि गदर या चित्रपटांनंतर अमीषाने हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड, भुलभुलैय्या, हमराज, थोडा प्यार थोडा मॅजिक यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र तिच्या पहिल्या दोन चित्रपटांप्रमाणे हे हिट ठरले नाहीत.

आणखी एका मुलाखतीत अमीषाने तिला ऑफर केलेल्या काही चित्रपटांचीही नावं घेतली. शाहरुख खानच्या ‘चलते चलते’, सलमान खानच्या ‘तेरे नाम’ आणि संजय दत्तच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकांचे ऑफर्स मिळाल्याचं तिने सांगितलं. मात्र इतर प्रोजेक्ट्स हाती असल्याने त्यांना नकार दिल्याचं तिने स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.