Ameesha Patel | किसिंग – इंटिमेट सीनबद्दल अमीषा पटेल हिने सोडलं मौन; ‘या’ अभिनेत्याचं नाव घेत म्हणाली…

Ameesha Patel | बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा उल्लेख करत आमीषा पटेल हिने सोडलं मौन; किसिंग - इंटिमेट सीनबद्दल अभिनेत्री म्हणाली..., सध्या सर्वत्र आमीषा पटेल हिच्या वक्तव्याची चर्चा...

Ameesha Patel | किसिंग - इंटिमेट सीनबद्दल अमीषा पटेल हिने सोडलं मौन; 'या' अभिनेत्याचं नाव घेत म्हणाली...
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 11:16 AM

मुंबई | 25 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री आमीषा पटेल सध्या तिच्या ‘गदर २’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा गेल्या १४ दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. १४ दिवसांत सिनेमाने ४१८.९० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर जगभरात सिनेमाने ५३० कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे. सध्या सर्वत्र सिनेमाच्या कमाईची चर्चा रंगत आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘गदर २’ प्रदर्शित झाल्यानंतर आमीषा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर होती. पण आता अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत पुन्हा वाढ झाली आहे. दरम्यान आमीषा पटेल हिने केलेलं वक्तव्य देखील तुफान चर्चेत आलं आहे. अभिनेत्रीने किसिंग सीन आणि इंटिमेट सीनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत आमीषा पटेल हिला ‘तुला इंडस्ट्रीमध्ये कोणती गोष्ट करायला आवडणार नाही..’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘ किसिंग सीन, इंटिमेट सीन आणि छोटे कपडे घालायला मला आवडणार नाही.. यागोष्टीच्या विरोधात आहे मी…’ असं देखील आमीषा म्हणाली. ( Ameesha Patel love life)

‘इंटिमेट, किसिंग सीन करताना मला अवघडल्यासारखं होतं. म्हणून मी असं कधीही करणार नाही. मी एका चौकटीत राहून काम करते.’ यावेळी आमीषा हिने बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याचं उदाहरण देत मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सलमान खान देखील कधीच ऑनस्क्रिन किसिंग सीन देत नाही..’ सध्या सर्वत्र आमीषा पटेल हिच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

हे सुद्धा वाचा

आमीषा पटेल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या ‘गदर २’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘गदर’ सिनेमा २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हा देखील चाहत्यांनी अभिनेते सनी देओल आणि आमीषा पटेल यांच्या जोडीला डोक्यावर घेतलं होतं. ‘गदर’ सिनेमाचा सिक्वल चाहत्यांना आवडत आहे. चाहत्यांमध्ये आजही सनी देओल यांची क्रेझ दिसत आहे.

‘गदर २’ सिनेमाची आतापर्यंतची कमाई

‘गदर २’ सिनेमाने पहिल्या आठवड्यात २८४.६३ कोटी रुपयांची कमाई केली. आठव्या दिवशी सिनेमाने २०.५ कोटी रुपये, नवव्या दिवशी ३१ कोटी रुपये, दाहव्या दिवशी ३८.९ कोटी रुपये, आकराव्या दिवशी १३.५० कोटी रुपये, बाराव्या दिवशी १२.१० कोटी रुपये आणि तेराव्या दिवशी सिनेमाने १० कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशात सिनेमा ‘पठाण’ सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक करु शकतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?.
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.