PM Modi: अमेरिकेत भारताच्या संस्कृतीचं दर्शन; परदेशी गायिका पडली मोदी यांच्या पाया आणि…

अमेरिकेतील गायिकेला देखील भारतीय संस्कृतीची भुरळ... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडली परदेशी गायिका... व्हिडीओ पाहून तुम्ही देखील म्हणाल...

PM Modi: अमेरिकेत भारताच्या संस्कृतीचं दर्शन; परदेशी गायिका पडली मोदी यांच्या पाया आणि...
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 10:19 AM

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांसाठी अमेरिका दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी परदेशात मोदी यांनी भारताला संबोधित केलं. अमेरिकेत रंगलेल्या कार्यक्रमात अमेरिकन गायिका मेरी मिलबेन हिने भारत देशाचं राष्ट्रगीत जन…गण…मन… गायलं… एवढंच नाही तर, गायिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया देखील पडली. सध्या अमेरिकन गायिका मेरी मिलबेन हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून भारतीय संस्कृतीचं दर्शन घण्याचं चित्र याठिकाणी दिसलं.. व्हिडीओ पाहून अनेकांनी अमेरिकन गायिका मेरी मिलबेन हिचं कौतुक केलं आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

अमेरिकन गायिका मेरी मिलबेनने वॉशिंग्टन डीसीच्या रोनाल्ड रीगन बिल्डिंगमध्ये भारताचे राष्ट्रगीत गायले आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडली हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे अमेरिकन गायिका मेरी मिलबेन प्रचंड आनंदी आणि उत्साही होती…

अमेरिकन गायिका मेरी मिलबेन हिचं राष्ट्रगीत गावून झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देखील तिचं कौतुक केलं. राष्ट्रगीत संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिचं कौतुक करण्यासाठी पुढे गेले..अशात मेरीने मोदी यांचे आशीर्वाद घेतले. तेव्हा मोदी यांनी गायिकेला पायाला स्पर्ष करु दिलं नाही.. सध्या सर्वत्र पंतप्रधान मोदी आणि मॅरी मिलबेन यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आंतरराष्ट्रीय गायिका मेरी मिलबेन हिने पीएम मोदींचे कौतुक केले आणि सांगितले की ‘पीएम मोदी हे अतिशय अद्भुत आणि दयाळू व्यक्ती आहेत’… सांगायचं झालं तर, यापूर्वी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मेरी मिलबेन हिने पंतप्रधान मोदींच्या संयुक्त राष्ट्र मुख्यालयात परफॉर्म केले होते.

मेरी तिच्या गाण्यांमुळे भारतात प्रचंड प्रसिद्ध लोकप्रिय आहे. याआधी मेरी हिने विष्णू यांची आरती देखील गायली होती. तिने गायलेली‘ओम जय जगदीश हरे’ आरती देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. भारताच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, मेरीने राष्ट्रगीत गायलं होतं. शिवाय 2022 मध्ये देखील मेरीला भारतात बोलावलं होतं.

मेरीला 76 व्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीत सादर करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त परफॉर्म करणारी मेरी पहिली अमेरिकन-आफ्रिकन गायिका ठरली. भारतात देखील अमेरिकन गायिका मेरी मिलबेन हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे..

Non Stop LIVE Update
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले.....
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले......
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका.
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका.
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील.
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले.
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?.
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध.
महाराष्ट्राची सेवा करण्याचे सुख काही औरच, म्हणूनच..,'काय म्हणाले मोदी
महाराष्ट्राची सेवा करण्याचे सुख काही औरच, म्हणूनच..,'काय म्हणाले मोदी.
वरळीची निवडणूक वन साईड होणार, सचिन अहिर यांनी केला दावा...
वरळीची निवडणूक वन साईड होणार, सचिन अहिर यांनी केला दावा....
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'.