Malaika Arora | अर्जुन कपूरशी ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान मलायकाची पोस्ट चर्चेत; बॉयफ्रेंडच्या कुटुंबीयांना केलं अनफॉलो

ब्रेकअपच्या या चर्चांदरम्यान दुसरीकडे अर्जुनचं नाव सोशल मीडिया इन्फ्लुएन्स कुशा कपिलासोबत जोडलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच कुशाने तिच्या पतीसोबत घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं होतं.

Malaika Arora | अर्जुन कपूरशी ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान मलायकाची पोस्ट चर्चेत; बॉयफ्रेंडच्या कुटुंबीयांना केलं अनफॉलो
Arjun Kapoor and Malaika AroraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 3:31 PM

मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र त्यावर अद्याप दोघांपैकी कोणीच प्रतिक्रिया दिली नाही. यादरम्यान मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं असून पुन्हा एकदा त्यांच्यातील दुराव्याची चर्चा होऊ लागली आहे. इतकंच नव्हे तर मलायकाने इन्स्टाग्रामवरून अर्जुनच्या कुटुंबीयांनाही अनफॉलो केलं आहे.

मलायकाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, ‘परिवर्तन हाच प्रकृतीचा नियम आहे. जे लोक फक्त भूतकाळ आणि वर्तमानकाळाकडे पाहतात, ते नक्कीच भविष्याला गमावून बसतात.’ ही पोस्ट वाचल्यानंतर अर्जुन आणि मलायका यांच्यामध्ये काहीतरी नक्कीच बिनसलंय, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. याशिवाय पापाराझींनी मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने जो को-ऑर्ड सेट परिधान केला होता, त्याच्या टॉपवर लिहिलं होतं, ‘चला, वेगळे होऊयात.’

हे सुद्धा वाचा

काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यानंतर या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना सुरुवात झाली. अर्जुनने इंस्टाग्रामवर व्हेकेशनचे काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये अर्जुन एकटाच व्हेकेशन एन्जॉय करताना दिसला. मात्र त्याच्या या फोटोंवर कुठेच मलायकाची प्रतिक्रिया दिसली नाही. तर दुसरीकडे मलायकासुद्धा एकटीच मुंबईत आयोजित केलेल्या प्रसिद्ध ए. पी. ढील्लनच्या पार्टीला पोहोचली होती. प्रत्येक वेळी एकत्र दिसणारं हे कपल आता वेगळे का झाले, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याच कारणामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आहे.

ब्रेकअपच्या या चर्चांदरम्यान दुसरीकडे अर्जुनचं नाव सोशल मीडिया इन्फ्लुएन्स कुशा कपिलासोबत जोडलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच कुशाने तिच्या पतीसोबत घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं होतं. अर्जुन कपूरसोबत नाव जोडलं गेल्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चर्चा नाकारल्या आहेत. ‘माझ्याबद्दल सध्या जी काही बेताल बडबड सुरु आहे, ती आधी बंद करा. मी फक्त एकच प्रार्थना करते की, या सर्व रंगणाऱ्या चर्चा माझ्या आईपर्यंत पोहोचता कामा नये. कारण तिला मोठा धक्का बसून शकतो’ असं म्हणत तिने अर्जुनसोबतच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.