AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बच्चन कुटुंबातील वादाची चर्चा , तिकडे अमिताभ – अभिषेकने उचललं मोठं पाऊल!

बच्चन कुटुंब कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सतत चर्चेत असतं. सध्या अभिषेक- ऐश्वर्याच्या नात्याबद्दल उलटसुलट गोष्टी ऐकायला मिळत आहेत. त्याच दरम्यान आता अभिषेकने वडिल अमिताभ बच्चन यांच्यासोबत मिळून एक मोठं पाऊल उचललं आहे.

बच्चन कुटुंबातील वादाची चर्चा , तिकडे अमिताभ - अभिषेकने उचललं मोठं पाऊल!
बच्चन कुटुंबातील वाद चर्चेत असताना अभिषेकचं मोठं पाऊल
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 11:04 AM

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचं कुटुंब सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल उलटसुलट चर्चा ऐकू येत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात दुरावा आला असून त्यांच्या घटस्फोटाबद्दलच्या अफवांनाही वेग आला आहे. मात्र त्यावर आत्तापर्यंत अभिषेक काही बोललेला नाही ना ऐश्वर्याने तिचं मौन सोडलं. जुलै महिन्यात अनंत आणि राधिका अंबानी यांच्या लग्नादरम्यान बच्चन कुटुंबातील मतभेद स्पष्टपणे दिसले. तेव्हा लग्नासाठी संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र होतं, अभिषेकही तिथेच होता. मात्र सूनबाई ऐश्वर्या आणि नात आराध्या त्यांच्यासोबत आल्या नाहीत, तर त्यांनी वेगळी एंट्री केली. तेव्हाच सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर आता काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या ही तिच्या कझिनच्या वाढदिवसाला आराध्यासोबत आणि आईसोबत उपस्थित होती, त्यांचे फोटोही व्हायरल झाले. मात्र त्यात अभिषेक बच्चन कुठेच दिसला नाही. आणि अफवांना ऊत आला.

याचदरम्यान आता बच्चन कुटुंबाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. कुटुंबातील बेबनावाबद्दल चर्चा असतानाच अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी दिवाळीपूर्वी रिअल इस्टेट मार्केटमध्ये तगडी इन्व्हेस्टमेंट केली आहे. बच्चन कुटुंबाने एक-दोन नव्हे तर 10 फ्लॅट्स मिळून खरेदी केले आहेत, ज्यांची किंमत कोट्यवधींमध्ये असल्याचे समजते.

रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी मुंबईतील मुलुंड पश्चिम येथे ही नवीन मालमत्ता खरेदी केली आहे. त्याची किंमत 24.95 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अहवालानुसार, हे नुकतेच बांधलेले अपार्टमेंट्स ओबेरॉय रियल्टीच्या इटरनियाच्या प्रीमियम निवासी प्रकल्पाचा भाग असून ते 3 BHK आणि 4 BHK रेडी-टू-मूव्ह-इन फ्लॅट्स आहेत.

दीड कोटींची स्टॅम्प ड्युटी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बच्चन कुटुंबाने तेथे एकूण 10 फ्लॅट्स खरेदी केले आहेत. या डीलमध्ये प्रत्येक अपार्टमेंटसाठी दोन डेडिकेटेड कार पार्किंग जागांचा देखील समावेश आहे. यासाठी एकूण दीड कोटींची स्टॅम्प ड्युची लावण्यात आली आहे. या 10 फ्लॅटचा एकूण एरिया 10,216 स्क्वेअर फूट असल्याचे सांगितले जाते.

रिअर इस्टेटमध्ये वाढवली गुंतवणूक

यापैकी सहा अपार्टमेंट्स अभिषेक बच्चनने खरेदी केल्याची चर्चा असून त्यांची किंमत सुमारे 14.77 कोटी रुपये आहे.तर अभिषेकचे वडील आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी उर्वरित चार फ्लॅट्स खरेदी केले आहेत. या गुंतवणुकीनंतर बच्चन कुटुंबाने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. अमिताभ बच्चन यांनी यावर्षी अयोध्येत अंदाजे 14.5 कोटी रुपये खर्चून 10,000 चौरस फुटांचा भूखंड खरेदी केला होता

एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं.
दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - मनोज जरांगे
दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - मनोज जरांगे.
पहलगाममध्ये पर्यटकांना सुखरूप ठेवणारा 'तो' देवदूत टिव्ही ९ मराठीवर
पहलगाममध्ये पर्यटकांना सुखरूप ठेवणारा 'तो' देवदूत टिव्ही ९ मराठीवर.
पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हाशिम मुसा, NIAचा रिपोर्ट
पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हाशिम मुसा, NIAचा रिपोर्ट.
पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास USचा ग्रीन सिग्नल? अ‍ॅक्शन घ्यावी, पण..
पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास USचा ग्रीन सिग्नल? अ‍ॅक्शन घ्यावी, पण...
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले.
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त.
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना.
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले.