जेव्हा ऐश्वर्याने सलमानविषयी जाहीरपणे व्यक्त केलं होतं प्रेम; मुलाखतीतील ‘त्या’ उत्तराने उंचावल्या सर्वांच्या भुवया

सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याचं नाव बऱ्याच अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं. मात्र अखेर तिने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. तर दुसरीकडे सलमान आजही अविवाहित आहे.

जेव्हा ऐश्वर्याने सलमानविषयी जाहीरपणे व्यक्त केलं होतं प्रेम; मुलाखतीतील 'त्या' उत्तराने उंचावल्या सर्वांच्या भुवया
Salman Khan and Aishwarya Rai (2)Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 3:56 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये सर्वाधिक गाजलेली प्रेमकहाणी म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची. या दोघांची प्रेमकहाणी जरी अधुरी राहिली असली तरी त्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये होते. एक काळ असा होता, जेव्हा हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. या दोघांना अनेकदा ठिकाणी एकत्र पाहिलं जायचं. सलमान – ऐश्वर्याचं प्रेमप्रकरण जितकं चर्चेत होतं, त्याहून अधिक चर्चा त्यांच्या ब्रेकअपची होती. या दोघांच्या नात्यात इतकी कटुता आली की पुन्हा ते कधीच एकमेकांसमोर आले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या दोघांचे काही एडिट केलेले व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यादरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाचीही चर्चा सुरू आहे. अशातच ऐश्वर्याचा एक जुना व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये ती सलमानबद्दल मोकळपणे बोलताना दिसतेय.

1999 मध्ये ऐश्वर्या राय ही सिमी गरेवाल यांच्या शोमध्ये पाहुणी म्हणून पोहोचली होती. या शोमध्ये तिने तिच्या खासगी आयुष्याशी संबंधित बरेच रंजक किस्से सांगितले. मात्र सिमी यांनी जेव्हा तिला इंडस्ट्रीतील सर्वांस सेक्सिएस्ट आणि हँडसम अभिनेत्याचं नाव विचारलं, तेव्हा ऐश्वर्याच्या उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या व्हिडीओत आधी ऐश्वर्या काही सेकंद शांत असते. नंतर म्हणते, “सेक्सिएस्ट शब्दाला चार्मिंग या शब्दाने आपण बदलू शकतो का?” त्यावर सिमी तिला म्हणतात की त्याच शब्दावर तुला व्यक्तीचं नाव घ्यावं लागेल.

हे सुद्धा वाचा

तेव्हा प्रश्नाचं उत्तर देताना ऐश्वर्या म्हणते, “मग तर मला त्याचंच नाव घ्यावं लागेल. ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय पुरुषांपैकी एक म्हणून निवडलं गेलं- सलमान खान. जर आपण लूक्सविषयी बोलत आहोत तर.” सलमानविषयी मोकळेपणे बोलताना पाहून नेटकऱ्यांनीही त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याचं नाव बऱ्याच अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं. मात्र अखेर तिने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. तर दुसरीकडे सलमान आजही अविवाहित आहे. ऐश्वर्यानंतर सलमानचंही नाव बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.