Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amisha patel | एक दोन नाही तर, चार सेलिब्रिटींसोबत अमिषा पटेल हिचे होते ‘प्रेमसंबंध’, तरी आज एकटीच

अमिषा पटेल 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत होती सिक्रेट रिलेशनशिपमध्ये... अभिनेत्रीचे चार सेलिब्रिटींसोबत 'प्रेमसंबंध', तरी आज एकटीच

Amisha patel | एक दोन नाही तर, चार सेलिब्रिटींसोबत अमिषा पटेल हिचे होते 'प्रेमसंबंध', तरी आज एकटीच
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 3:47 PM

मुंबई | अभिनेत्री अमिषा पटेल सध्या ‘गरद २’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘गदर’ सिनेमाच्या यशानंतर तब्बल २२ वर्षांनी ‘गरद २’ सिनेमा चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाचा ट्रीझर आणि ‘उड जा काले कावा..’ हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. ‘गदर’ सिनेमात अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांची लव्हस्टोरी चाहत्यांनी अनुभवली. ‘गदर’ सिनेमानंतर चाहत्यांनी सनी – अमिषा यांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. ‘गदर’ सिनेमाची लव्हस्टोरी जशी रंगली, तशी लव्हस्टोरी मात्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात रंगली नाही. एक काळ होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त अमिषा पटेल हिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा होती. यशाच्या शिखरावर चढत असताना अभिनेत्रीचं एक दोन नाही तर तब्बल चार सेलिब्रिटींसोबत नाव जोडण्यात आलं. पण कोणासोबतही अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही…

अनेक सेलिब्रिटींसोबत अमिषा पटेल हिचे प्रेमसंबंध होते, पण कोणासोबतही अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. संपत्ती, प्रसिद्धी असूनही अमिषा वयाच्या ४७ व्या वर्षी देखील अविवाहित आहे. अशात जेव्हा अमिषा पटेल हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगत होत्या तेव्हा, अनेक वाद चाहत्यांसमोर आले.

अमिषा पटेल हिचं नाव सर्व प्रथम बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते विक्रम भट्ट यांच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी जवळपास पाच वर्ष एकमेकांना डेट केलं. पण अमिषा आणि विक्रम यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. नात्यात सतत वाद होत असल्यामुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा

अमिषा पटेल हिच्या दुसऱ्या अफेअरबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अभिनेत्री आलिया भट्ट हिचा पती आणि अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत देखील अमिषा सिक्रेट रिलेशनशिपमध्ये होती. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं. पण जेव्हा दोघांच्या नात्याची चर्चा रंगू लागली, तेव्हा रणबीर याने अमिषा हिच्यासोबत असलेलं नातं संपवलं.

रणबीर कपूर याच्यानंतर अभिनेत्रीचं नाव प्रसिद्ध आणि श्रीमंत उद्योजक नेस वाडिया यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं. दोघे लग्न देखील करणार होते. पण नातं लग्नापर्यंत पोहोचण्याआधीचं तुटलं. ज्यामुळे अभिनेत्री प्रचंड खचली होती.

अभिनेत्रीचं नाव लंडनमधील प्रसिद्ध उद्योजक कनव पुरी यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं. २००८ साली कनव आणि अमिषा यांच्या नात्याची तुफाम चर्चा रंगली. पण लंडनच्या उद्योजकासोबत देखील अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.. प्रेमात सतत ब्रेकअपचा सामना करावा लागत असल्यामुळे अभिनेत्रीने आयुष्यभर एकटी राहण्याचा निर्णय घेतला. आज अमिषा सिंगल आयुष्य जगत आहे.

भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.