Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kerala Story: ‘या’ कारणामुळे चित्रपटगृह मालकांना मिळतेय धमकी, भाजप नेत्याचा मोठा दावा

'यापेक्षा आणखी वाईट काय... ', 'द केरळ स्टोरी' सिनेमा प्रकरणार चित्रपटगृह मालकांना मिळतेय 'अशी' धमकी, भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

The Kerala Story: 'या' कारणामुळे चित्रपटगृह मालकांना मिळतेय धमकी, भाजप नेत्याचा मोठा दावा
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 10:57 AM

मुंबई : दिग्दर्शत सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. ५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचा अनेक ठिकाणी विरोध करण्यात आला. शिवाय काही राज्यांमध्ये सिनेमा बॅन देखील करण्यात आला होता. पण त्याचा कोणताही परिणाम सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर झाला नाही. बॉक्स ऑफिसवर सिनेमा तुफाण कमाई करताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील ‘द केरळ स्टोरी’वरील बंदी उठवल्यानंतरही चित्रपटगृहांमध्ये सिनेमा प्रदर्शित करण्यात आलेला नाही. कोलकात्यामध्ये स्थानिक प्रशासन चित्रपटगृह मालकांना धमकावत आहे. स्क्रीनिंग केल्यास ‘दंडात्मक कारवाई’ करण्याची धमकी चित्रपटगृह मालकांना देण्यात येत असल्याचा दावा भाजपचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे…

ट्विट करत अमित मालवीय यांनी खळबळजनक दावा केला आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले, ‘सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगालमधील द केरळ स्टोरीवरील बंदी उठवल्यानंतर, कोलकात्यामधील एकाही चित्रपटगृहात सिनेमा प्रदर्शित करण्यात आलेला नाही. ममता बॅनर्जी यांनी सिनेमाला बंदी घालण्याआधी चित्रपटगृह हाऊसफुल्ल होत होते.. स्थानिक प्रशासनाकडून सिनेमा हॉल मालकांना दंडात्मक कारवाई, इमारत आणि अग्निशमन परवाने रद्द करण्याची धमकी दिली जात आहे.. आणि यात यापेक्षा आणखी वाईट काय…

अमित मालवीय ट्विटमध्ये पुढे म्हणाले, ‘हा न्यायालयाचा अवमान नाही तर काय आहे? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या अवहेलनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी.. जर बॅनर्जी न्यायालयाचा आदेश अशा प्रकारे झुगारुन लावत असतील, तर याठिकाणी कायद्याचे राज्य किती क्षीण आहे याची कल्पना करता येईल…’ सध्या सर्वत्र अमित मालवीय यांच्या ट्विटची चर्चा रंगत आहे.

‘द केरळ स्टोरी’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारने घातलेली सिनेमावरील बंदी उठवली आहे. त्यानंतर देखील सिनेमाला विरोध असल्याचा दावा अमित मालवीय यांनी केला आहे. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा फक्त भारतात नाही तर, पदरेशात देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. संपूर्ण देशभरातून सिनेमाला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाने पहिल्या आठवड्यात १०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केलीा आहे. पण आता सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावला आहे. दुसऱ्या आठवड्यात गुरुवारी सिनेमाने फक्त ७ कोटी रुपयांच्या गल्ला जमा केला आहे. सिनेमाने आतापर्यंत १७१.७२ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे. आता सिनेमा २०० कोटी रुपयांचा गल्ला जमा करेल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.