Amitabh Bachchan: अमिताभ-रश्मिकाचे याचे ‘गुडबाय’ मधील ‘जयकाल महाकाल’ हे गाणे रिलीज, ऐकून तुम्ही व्हाल भावूक
अमिताभ बच्चन यांनीही हे गाणे त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या गाण्याला रिलीज झाल्यापासून २४ तासांत २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या गुडबायच्या ट्रेलरमध्ये या गाण्याचे संगीत बॅकग्राउंडमध्ये वाजले होते.

बॉलीवूडमधील जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) त्यांच्या आगामी ‘गुड बाय’ (Goodbye)चित्रपटामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला. त्यानंतर आता यातील एक’जयकाल महाकाल’ हे नवीन गाणेही समोर आले आहे. या चित्रपटात KBC मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत साऊथ फेम रश्मिका मंदान्नाही (Rashmika Mandanna)महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या नव्या गाण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. प्रेक्षकांनी हे गाणे लवकरच रिलीज करण्याचे आवाहन केले होते, ज्याची प्रतीक्षा आता संपली आहे. हे गाणे खूपच भावूक असून चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट या गाण्यात दिसून येत आहेत आहे.
सोशल मीडियावर केले शेअर
अमिताभ बच्चन यांनीही हे गाणे त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या गाण्याला रिलीज झाल्यापासून 24 तासांत 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या गुडबायच्या ट्रेलरमध्ये या गाण्याचे संगीत बॅकग्राउंडमध्ये वाजले होते. तेव्हापासून हे गाणे रिलीज करण्याची मागणी प्रेक्षकांकडून होत होती.



View this post on Instagram
आतापर्यंत 2,984,540 लोकांनी हे गाणे पाहिले आहे. त्यामुळे चाहत्यांना आता चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. JaikalMahakal का राग और परिवार का प्यार, दोनो गूँजेगा हर दिल में अबकि बार! ❤️ असे कॅप्शन अमिताभ यांनी या व्हिडीओला दिले आहे..