Amitabh-Jaya 50th Anniversary : संकटातही सोडली नाही एकमेकांची साथ; पाहा अमिताभ – जया यांच्या लग्नाची पत्रिका
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन - अभिनेत्री जया बच्चन यांच्या लग्नाची पत्रिका पाहिली आहे का? पत्रिकेचा खास फोटो व्हायरल... सध्या सर्वत्र त्यांच्या लग्नाच्या पत्रिकेची चर्चा
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांच्या लग्नाला आज ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. सध्या सर्वत्र बिग बी आणि जया बच्चन यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या चर्चा रंगत आहे. चाहत्यांनी बिग बी आणि जया बच्चन यांच्या जोडीला फक्त ऑनस्क्रिन नाही तर, ऑफस्क्रिन देखील प्रेम दिलं. बिग बी आणि जया यांनी एकत्र अनेक सिनेमांमध्ये काम केलं. दोघांच्या सिनेमांना चाहत्यांनी देखील भरभरुन प्रेम दिलं. बिग बी आणि जया यांची रिल लाईफ स्टोरी आणि रियल लाईफ स्टोरी प्रचंड हटके आहे. बिग बी आणि जया यांची लव्ह स्टोरी प्रचंड भन्नाट आहे. वडिलांच्या एका अटीनंतर दोघांचं लग्न झालं. बिग बी आणि जया यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, पण दोघांनी कधीही एकमेकांची साथ सोडली नाही..
बिग बी आणि जया बच्चन यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. पण आता लग्नाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या लग्नाची पत्रिका तुफान व्हायरल होत आहे. पत्रिका स्पष्ट दिसत नसली तर, पत्रिकेवरील अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचं नाव दिसत आहे. सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाच्या पत्रिकेची चर्चा रंगत आहे.
बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची जोडी. करियरची सुरुवात केल्यानंतर लगेच बिग बींच्या वाट्याला यश आलं नाही. त्यांचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर फेल ठरले. पण ते खचले नाही किंवा त्यांनी कधी मागे वळून कधीही पाहिलं नाही. अशा परिस्थितीत अमिताभ बच्चन यांना साथ लाभली ती म्हणजे जया बच्चन यांची. दोघांच्या सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात राज्य केलं.
१९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर’ सिनेमात दोघे एकत्र झळकलं. सिनेमाने चाहत्यांच्या मनात आणि बॉक्स ऑफिसवर राज्य केलं. सिनेमा सुपरहिट ठरल्यानंतर टीमने लंडन याठिकाणी फिरायला जाण्याचा प्लान केला. सिनेमाच्या यशानंतर जेव्हा लंडनला जाण्याची वेळ आली तेव्हा, बिग बींच्या वडिलांनी त्यांना लग्नाशिवाय जया यांच्यासोबत जाण्याची परवानगी दिली नाही.
लंडनला एकत्र जायचं असेल तर, आधी लग्न करा त्यानंतर फिरायला जा… वडिलांच्या हट्टानंतर अमिताभ बच्चन लग्नासाठी तयार झाले. ही गोष्ट बिग बी यांनी जया यांना सांगितली आणि आई – वडिलांच्या इच्छेने अमिताभ बच्चन आणि जया बच्चन याचं लग्न झालं. ३ जून १९७३ मध्ये सध्या पद्धतीत अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी लग्न केलं. एकदा नव्या हिच्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी लग्नाबद्दल सांगितलं होतं.