अब तो अपना राज है, डरने की क्या बात…, अमिताभ बच्चन यांनी हटके स्टाईलमध्ये केलं मतदान करण्याचं आवाहन
Lok sabha election 2024 : अमिताभ यांनी हटके आणि विनोदी अंदाजात केलं मतदान करण्याचं आवाहन, व्हिडीओ पाहून व्हाल आनंदी, सध्या सर्वत्र बिग बी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओची चर्चा..., व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून होत आहे लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव
Lok sabha election 2024 : सध्या सर्वत्र निवडणुकीचं वातावरण आहे सोमवारी पाचव्या टप्प्यातील निवडणूक पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा आज असल्यामुळे दिग्गज नेत्यांची प्राण प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुंबईत देखील मतदान होत असल्यामुळे अनेक सेलिब्रिटी त्यांचा मतदानाचा हक्क बजावताना दिसणार आहेत. शिवाय सेलिब्रिटी चाहत्यांना देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सांगत आहेत. तर महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील हटके अंदाजात मतदान करण्यास सांगितलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ प्रचंड विनोदी आहे. गायक बादशाह याच्या ‘पॅरोडी’ गाण्यावर नवं गाणं तयार करण्यात आलं आहे. गाण्याचे बोल जाणून तुम्ही देखील पोट धरुन हसाल… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बिग बी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
T 5016 (ii) – Tomorrow is your day for Vote Mumbai /Maharashtra …. Exercise your right .. pic.twitter.com/GyG801deRk
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 19, 2024
गाण्याचे बोल, ‘वोटिंग वाला दिन है यारों कोई भी वोटर रह न जाए, डीजे को समझा लो दीदी, वोट डालने को आ जाए, सारे क्रांतिकारी, ईवीएम का बटन दबाएं, और जिसने वोट नहीं डाला, ज्ञान बांटने फिर न आए, 5 साल की बात है, ये मौके रोज न आते हैं. वोट डालने जाना, क्या घरवाले रोके हैं, अब तो अपना राज है, डरने की क्या बात है, आज नई शुरुआत है, आज नई शुरुआत है, अभी तो वोटिंग शुरू हुई है.’
व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी खास कॅप्शन देखील दिलं आहे. ‘मुंबईत मदतानाचा दिवस आहे. तुमची जबाबदारी पार पाडा…’, बिग बींच्या आधी आभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता सलमान खान यांनी देखील चाहत्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन केलं आहे.
अक्षय कुमार याने देखील केलं मतदान
अक्षय कुमारा म्हणाला, ‘माझा भारत विकसित आणि मजबूत राहावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. हीच एक गोष्ट लक्षात ठेवून मी मतदान केलं आहे. अशाच प्रमाणे पूर्ण भारताने मदतानाचा हक्क बजावला पाहिजे. तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटत आहे, त्या उमेदवाराला मतदान करा.’ भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमार याने पहिल्यांदा मतदान केलं आहे. अमिताभ बच्चन यांचे आगामी सिनेमे
अमिताभ बच्चन कायम त्यांच्या कामासाठी तत्पर असतात. सोशल मीडियावर देखील अमिताभ बच्चन कायम सक्रिय असतात. चाहत्यांच्या संपर्कात राहायला देखील अमिताभ बच्चन यांना प्रचंड आवडतं. चाहते देखील त्यांची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या 80 व्या वर्षी देखील बिग बी रुपेरी पडद्यावर सक्रिय आहेत. अमिताभ बच्चन लवकरच कल्कि 2898 AD मध्ये दिसणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांची चर्चा रंगली आहे.