वयाच्या 81 व्या वर्षीही का काम करताय, विचारणाऱ्यांवर भडकले बिग बी; म्हणाले “तुम्हाला अडचण..”

अभिनेते अमिताभ बच्चन हे वयाच्या 80 वर्षांनंतरही बॉलिवूड इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. चित्रपट, शोज, जाहिराती यात ते सातत्याने काम करत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका ब्लॉगमध्ये त्यांनी यामागचं कारण सांगितलं आहे. त्याचप्रमाणे सतत प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

वयाच्या 81 व्या वर्षीही का काम करताय, विचारणाऱ्यांवर भडकले बिग बी; म्हणाले तुम्हाला अडचण..
Amitabh BachchanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 8:51 AM

बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे वयाच्या 81 व्या वर्षीही कलाविश्वात प्रचंड सक्रिय आहेत. चित्रपटांशिवाय ते जाहिराती, ‘कौन बनेगा करोडपी’सारख्या शोचं सूत्रसंचालन यांमध्ये व्यस्त असतात. कामाप्रती त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवणारा आहे. बिग बी हे सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतात. नुकत्याच एका ब्लॉगमध्ये त्यांनी चाहत्यांकडून सतत विचारल्या जाणाऱ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं. “या वयातही ते इतकं काम का करतात”, असा प्रश्न बिग बींना अनेकदा विचारण्यात येतो. त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.

ब्लॉगमध्ये दिलं उत्तर

या वयातही ते सतत काम का करतात, या प्रश्नावर बिग बींनी लिहिलंय, “कारण मला अजूनही काम मिळतंय. लोक सेटवर मला रोज विचारतात की अखेर इतकं काम करण्यामागचं कारण काय आहे? माझ्याकडे त्याचं ठोस उत्तर नाही. पण मी हे नक्की म्हणू शकतो की मला अजूनही काम मिळतंय. यापेक्षा दुसरं काय कारण असू शकतं? विविध प्रसंग आणि परिस्थितीबाबत इतरांचं आकलन वेगळं असू शकतं. अनेकदा त्यांना स्वत:चं कारण महत्त्वाचं वाटू शकतं. पण तुम्ही माझ्या ठिकाणी उभं राहून पहा आणि त्यामागचं कारण शोधून काढा.”

टीकाकारांना सडेतोड जवाब

याबाबतीत ते पुढे लिहितात, “कदाचित तुम्ही योग्य असाल, कदाचित नसालही. तुम्हाला तुमचे निष्कर्ष काढण्याचं स्वातंत्र्य आहे आणि मला माझ्या कामाचं स्वातंत्र्य आहे. मला माझं काम देण्यात आलं. जेव्हा तुम्हाला काम देण्यात येतं, तेव्हा तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊन पहा. माझ्या कारणांशी कदाचित तुम्ही सहमत नसाल. पण अभिव्यक्तीच्या अधिकाऱ्याने अनेक बोगदे निर्माण झाल्याने तुमचं ऐकलं जातंय. तुम्ही म्हणालात, मी ऐकलं. मी काम करण्याचं कारण दिलं. तो मी आहे. माझ्याकडे जे कारण आहे ते माझं कारण आहे. शटर बंद करून कुलूप लावलेलं आहे. तुमच्याकडे कंटेट नसल्याने तुम्ही स्वत:च वाळूचे किल्ले बांधायला घेता आणि त्याच्या निर्मितीचा आनंद उपभोगता. पण कालांतराने हे वाळूचे किल्लेही ढासळतात.”

हे सुद्धा वाचा

“जर तुम्ही असे किल्ले बांधत असाल तर त्यात कायमस्वरुपी काहीतरी असेल असं निमित्त शोधा. जर ते फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या कामासाठी बांधलं असेल तरच. माझं बांधून पूर्ण झालं आहे आणि ते अजूनही स्थिर आहे. मी काम करतो आणि हे अटळ आहे. तुम्हाला त्यात काही अडचण आहे का? तर मग कामाला लागा आणि त्याचं उत्तर शोधा,” असं ते थेट म्हणाले आहेत.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.