Aishwarya Rai मुळे चमकलं सासऱ्यांचं नशीब, ‘ही’ व्यक्ती देखील झाली मालामाल

Aishwarya Rai : जेव्हा ऐश्वर्या राय हिच्यामुळे अमिताभ बच्चन यांचं मोठं संकट झालं होतं दूर... बिग बी संकट मुक्त तर झालेच, पण 'ही' व्यक्ती देखील झाली मालामाल... फार कमी लोकांना माहिती आहे 'हा' किस्सा... ऐश्वर्या राय हिच्यामुळे अनेकांच्या लोकप्रियतेत झाली मोठी वाढ...

Aishwarya Rai मुळे चमकलं सासऱ्यांचं नशीब, 'ही' व्यक्ती देखील झाली मालामाल
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 10:18 AM

मुंबई : 1 नोव्हेंबर 2023 : ‘पैसा वहीं लगाया जाता है, जहां से फायदा मिले’, ‘तवायफों की तकदीर में शौहर नहीं होते..’, ‘कैसे करता वो गुरुर, उसके चाँद पर दाग जो है…’ आपल्या अनोख्या अंदाजात डायलॉग म्हणत अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ऐश्वर्या राय हिचा अनोखा अंदाज, सौंदर्य, डान्स, उत्तम अभिनय… यांसारख्या अनेक गोष्टींमुळे फक्त सर्वसामान्य जनताच नाही तर, असंख्या सेलिब्रिटी देखील ऐश्वर्या राय हिच्यावर फिदा आहेत… ९० च्या दशकात ऐश्वर्या राय हिने बॉलिवूडवर राज्य केलं, पण आज देखील अभिनेत्रीची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही ऐश्वर्या हिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात…

‘कुछ न कहो’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘धूम’, ‘देवदास ‘ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत ऐश्वर्या हिने चाहत्यांच्या मनात घर केलं. ऐश्वर्या हिच्या उत्तम अभिनयामुळे सिनेमांना वेगळी दिशा मिळाली. १९९७ मध्ये ऐश्वर्या हिने तिच्या करियरची सुरुवात केली. ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमामुळे ऐश्वर्या हिच्या लोकप्रियतेत वाढ झाली असं अनेकांचं म्हणणं आहे. पण अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत स्क्रिन शेअर केल्यानंतर देखील ऐश्वर्या हिचं कौतुक झालं.

ऐश्वर्या – शाहरुख यांनी २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहबतें’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमात ऐश्वर्या हिची भूमिका फार लहान होती. पण त्याच भूमिकेमुळे सिनेमा वेगळ्या उंचीवर पोहोचला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आणि याचा फायदा महानायक अमिताभ बच्चन यांना झाला.

सिनेमात ऐश्वर्या हिने ‘मेघा’ ही भूमिका बजावली होती. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तेव्हा ४१ कोटींहून अधिक रुपयांचा गल्ला जमा केला. रिपोर्टनुसार सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांच्यावर कर्जाचं डोंगर होतं. पण सिनेमाला मिळालेल्या यशानंतर बिग बी यांचं कर्ज फिटलं असं देखील सांगण्यात येत. शिवाय निर्माते देखील ‘मोहबतें’ सिनेमामुळे मालामाल झाल्याची माहिती समोर आली होती.

‘मोहबतें’ सिनेमामुळे अनेक नव्या कलाकारांच्या करियरला नवी दिशा मिळाली, तरी काही मात्र आज बॉलिवूडपासून दूर आहेत. ऐश्वर्या आता अधिक सिनेमांमध्ये झळकत नसली तरी, अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आज ऐश्वर्या हिचा वाढदिवस असल्यामुळे तिच्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.