ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा, बिग बींची क्रिप्टिक पोस्ट; म्हणाले, ‘आता फार उशीर…’

Amitabh Bachchan Post: ऐश्वर्या - अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना बिग बींची क्रिप्टिक पोस्ट नक्की कोणासाठी? म्हणाले, 'आता फार उशीर...', बच्चन कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतं...

ऐश्वर्या - अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा, बिग बींची क्रिप्टिक पोस्ट; म्हणाले, 'आता फार उशीर...'
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 12:50 PM

Amitabh Bachchan Post: अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये देखील एकत्र काम केलं आहे. 2007 मध्ये कुटुंबियांच्या उपस्थितीत ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगी देखील आहे. सांगायचं झालं तर, एक पॉव्हर कपल म्हणून ऐश्वर्या – अभिषेक यांची ओळख होती. पण गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. अनेक ठिकाणी आता अभिषेक पत्नीसोबत दिसत नाही.

ऐश्वर्या – अभिषेक आता पूर्वीप्रमाणे कोणत्याच कार्यक्रमात दिसत नाहीत. दरम्यान, अनंत अंबानी यांच्या लग्नात देखील ऐश्वर्या एकटी लेकीसोबत आली होती. तेव्हा देखील ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. पण नंतर एक व्हिडीओ समोर आला त्यामध्ये ऐश्वर्या – अभिषेक एकत्र दिसले.

ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना अभिनेत्याचं नाव को-स्टार निम्रत कौर हिच्यासोबत जोडण्यात आलं. अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर यांनी ‘दसवी’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. सिनेमात निम्रत हिने अभिषेकच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

दरम्यान, निम्रत हिचा एका व्हिडीओ समोर आल्यानंतर अभिनेत्रीच्या अफेअरची चर्चा रंगू लागली. पण यावर अभिषेक याने कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. अभिषेकने निम्रतसाठी ऐश्वर्याची फसवणूक केल्याचा दावा एका Reddit युजरने केल्यानंतर, नेटकऱ्यांनी अफवेवर लगेच विश्वास ठेवला आणि निम्रतचे नाव अभिनेत्यासोबत जोडण्यास सुरुवात केली, तरीही ऐश्वर्या-अभिषेकने या निराधार अफवांवर प्रतिक्रिया दिली नाही.

अमिताभ बच्चन यांची पोस्ट…

ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट केली आहे. ‘फार उशीर झाला आहे, त्यामुळे नंतर भेटू…’ अशी पोस्ट बिग बी यांनी केली आहे. बिग बी यांची पोस्ट ऐश्वर्या – अभिषेक याच्याशी निगडीत असल्याचा अंदाज अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.