नवऱ्याच्या नावावर जया बच्चन यांचा संताप, बिग बी क्रिप्टिक पोस्ट करत म्हणाले, ‘समय बडा…’
Jaya Bachchan On Husband Amitabh Name : नवऱ्याच्या नावाने हाक मारताच जया बच्चन यांचा राज्यसभेत संताप, अमिताभ बच्चन यांनी शेअर केली क्रिप्टिक पोस्ट; म्हणाले, 'समय बडा...', सध्या सर्वत्र बिग बी यांनी शेअर केलेल्या पोस्टची चर्चा
महानायक अभिताभ बच्चन यांच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री जया भादुरी यांनी आनंदाने बच्चन नावाचा स्वीकार केला. पण जेव्हा राज्यसभेत उपसभापति हरिवंश नारायण सिंह यांनी त्यांना ‘जया अमिताभ बच्चन’ या नावाने हाक मारली, तेव्हा जया बच्चन संतापल्या आणि त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या नावाचा अर्थ विचारला. सांगायचं झालं तर, महिलांना पतीच्या नावाने मिळणारी ओळख जया बच्चन यांना अवडली नाही. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केल्या. जया बच्चन यांच्या नावावरून वाद सुरु असताना अमिताभ बच्चन यांनी एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
अमिताभ बच्चन यांनी एक्स (ट्विटर) वर एका क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. बिग बींच्या पोस्टचा जया बच्चन यांच्या नावाशी काही संबंध नसल्याचं दिसत आहे. पोस्ट वाचल्यानंतर असं वाटतं की, ‘कोन बनेगा करोडपती’ शोच्या नव्या सीझनसाठी बिग बी यांनी पोस्ट लिहिली आहे.
T 5094 – समय बड़ा बलवान ! काम के लिए समय निकाल रहे हैं
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 6, 2024
पोस्ट शेअर करत अमिताभ बच्चन म्हणाले, ‘समय बड़ा बलवान! काम के लिए समय निकाल रहे हैं…’ शिवाय अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून वेळेबद्दल स्वतःचे विचार मांडले आहे. बिग म्हणाले, ‘सतत कामासाठी धावपळ करणं… कामावरुन परत येणं… आयुष्य धकाधकीचं झालं आहे. पण असं असताना देखील शुभचिंतक आणि चाहत्यांसाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करत आहे… माझे आभार आणि प्रेम…’
अमिताभ बच्चन पुढे म्हणाले, ‘कामातील विविधता एक अद्भुत संतुलन प्रदान करते. फिल्म, टीव्ही, संगीत, जाहिराती, कँपेन आणि सर्वांत खास म्हणजे वडिलांच्या शब्दांची रिकॉर्डिंग… ते अनंत काळापर्यंत सोबत राहातात. रिकॉर्डिंग अशा लोकांना ऐकवा जे शब्द समजतात आणि स्वतःला त्यात समर्पित करतात, कवीसाठी सर्वात मोठं अव्हान आणि आश्चर्य आहे. ही सर्वशक्तिमानाची देणगी आहे. माझे प्रेम आणि बरेच काही…’ असं बिग बी ब्लॉगमध्ये म्हणाले.
जया बच्चन आणि त्यांचं नाव
जया बच्चन यांच्या नावावरुन वाद सुरु असताना राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी थेट त्यांना नाव बदलण्याचा सल्ला दिला. पण जया बच्चन यांनी असं करण्यास स्पष्ट नका दिला. जया बच्चन म्हणाल्या, ‘नाही सर,, मला प्रचंड गर्व आहे. मला माझ्या नावावर आणि माझ्या पतीने मिळवलेल्या यशाचा मला गर्व आहे. हे नाटक तुम्ही सर्वांनी सुरु केलं आहे. यापूर्वी असं काहीही नव्हतं…’ असं देखील जया बच्चन म्हणाल्या.