World Cup 2023 : पराभवानंतर अमिताभ बच्चन यांची क्रिप्टिक पोस्ट; चाहत्यांची निराशा

World Cup 2023 : 'बच्चन साहेबांनी लपून मॅच पाहिली', महानायक अमिताभ बच्चन यांच्या क्रिप्टिक पोस्टवर मराठी अभिनेत्याची प्रतिक्रिया...सोशल मीडियावर वर्ल्ड कप 2023 चे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे.

World Cup 2023 : पराभवानंतर अमिताभ बच्चन यांची क्रिप्टिक पोस्ट; चाहत्यांची निराशा
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 12:16 PM

मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : आयसीसी वर्ल्ड कप 2023 फायनल भारत हारल्यामुळे देशाच निराशेचं वातावरण आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये रंगलेल्या वर्ल्ड कप 2023 फायनल सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. सांगायचं झालं तर, ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपवर सहाव्यांदा आपलं नाव कोरलं आहे. भारताच्या पराभवानंतर सर्वसामान्य जनतेसह सेलिब्रिटी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त करत आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील भारताच्या पराभवानंतर एक्स (ट्विटर)वर क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.

रविवारी रंगलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामान्यात भारताचा पराभव झाला. यावर बिग बी म्हणाले, ‘कुछ भी तो नहीं…’, अमिताभ बच्चन यांच्या क्रिप्टिक पोस्टनंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.

बिग बी यांच्या पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘तुम्हाला माहिती होती तुम्ही सामना पाहिल्यानंतर भारताचा पराभव होतो, असं असताना तुम्ही रिस्क का घेतली…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सर तुम्ही पूर्ण सामना पाहिला असेल म्हणून आपण हारलो…’. अमिताभ बच्चन यांच्या वक्तव्यावर अनेकांना नाराजी व्यक्त केली आहे.

सांगायचं झालं तर, भारताने सेनी फायनल सामन्यात विजय मिळवल्यानंतर अभिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.. पोस्टमध्ये बिग बी म्हणाले होते, ‘जेव्हा मी सामना पाहत नाही, तेव्हा आपण जिंकतो…’ यावर मराठी अभिनेता गश्मीर महाजनी याने प्रतिक्रिया दिली आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीवर अभिनेता म्हणाला, ‘बच्चन साहेबांनी लपून मॅच पाहिली’ गश्मीर महाजनी याची पोस्ट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त वर्ल्ड कप 2023 फायनलची चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर वर्ल्ड कप 2023 चे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर चाहत्यांनी गर्दी केली होती. अनेक सेलिब्रिटी देखील स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. अभिनेता शाहरुख खान, गौरी खान, आर्यन खान, सुहाना खान याच्यासोबतच , रणवीर सिंग, आयुष्मान खुराना, दीपिका पादुकोण, विवेक ओबेरॉय भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.