‘त्या’ एका घटनेनं बदललं अमिताभ बच्चन यांच्या मुलीचं आयुष्य; पुन्हा कधीच अभियन न करण्याचा घेतला निर्णय

श्वेताचा मुलगा अगस्त्य लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. झोया अख्तरच्या चित्रपटात तो भूमिका साकारणार आहे. मात्र मुलगी नव्या नवेलीनेही बॉलिवूड इंडस्ट्रीत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.

'त्या' एका घटनेनं बदललं अमिताभ बच्चन यांच्या मुलीचं आयुष्य; पुन्हा कधीच अभियन न करण्याचा घेतला निर्णय
Amitabh and Shweta BachchanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 11:04 AM

मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटलं जातं. त्यांची पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन यांनीसुद्धा कलाकार म्हणून नाव कमावलं. मात्र बिग बी यांची मुलगी श्वेता नंदा हीच चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. श्वेताला प्रकाशझोतात यायला आवडत नाही. याचा खुलासा तिने स्वत:च केला होता. 17 मार्च रोजी श्वेताचा जन्म झाला. आज (शुक्रवार) तिचा वाढदिवस आहे. इतका मोठा फिल्मी बॅकग्राऊंड असून सुद्धा श्वेताने इंडस्ट्रीत करिअर करण्याचा विचार कधीच केला नाही. यामागे एक घटना कारणीभूत होती.

खरंतर बऱ्याच कारणांमुळे श्वेताने स्वत:ला फिल्मी विश्वापासून दूरच ठेवलं. ती जेव्हा ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये आली, तेव्हा तिने यामागचं खरं कारण सांगितलं होतं. श्वेता म्हणाली, “जेव्हा मी लहान होती, तेव्हा आई-वडिलांसोबत वेळ घालवण्यासाठी त्यांच्यासोबत अनेकदा सेटवर जायची. एके दिवसी मी डॅडींच्या मेकअप रुपमध्ये खेळत होती. त्याचवेळी माझं बोट एका सॉकेटमध्ये अडकलं. त्या घटनेनंतर मी सेटवर जाणं सोडून दिलं.” या घटनेमुळे ती फिल्म इंडस्ट्रीपासूनच दूर झाली, असं तिने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

श्वेताला गर्दीची ठिकाणंही आवडत नाहीत. गर्दी असलेल्या ठिकाणी तिला भीती वाटू लागते. सेटवर बरेच लोक उपस्थित असतात. त्यांना पाहून अस्वस्थ वाटतं, असं ती म्हणाली. याच कारणामुळे ती लाइमलाइटपासून दूरच असते. श्वेताने व्यावसायिक निखिल नंदाशी लग्न केलं. या दोघांना अगस्त्य आणि नव्या नवेली नंदा ही दोन मुलं आहेत. श्वेताचा मुलगा अगस्त्य लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. झोया अख्तरच्या चित्रपटात तो भूमिका साकारणार आहे. मात्र मुलगी नव्या नवेलीनेही बॉलिवूड इंडस्ट्रीत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.

View this post on Instagram

A post shared by S (@shwetabachchan)

एका मुलाखतीत नव्याने स्पष्ट केलं, “मला डान्सिंग आणि गाण्याची आवड आहे. पण त्या गोष्टींकडे मी करिअर म्हणून पाहत नाही. माझा आधीपासूनच बिझनेसकडे अधिक कल आहे. माझी आजी आणि काकी या दोघी वर्किंग वुमन होत्या. त्या दोघींचं कौटुंबिक व्यवसायात महत्त्वपूर्ण योगदान आहे. माझे वडील आणि आजोबा त्यांची मतं विचारायचे. त्या क्षेत्रात काम करायला मी नेहमीच उत्सुक आहे. नंदा कुटुंबातील माझी चौथी पिढी आहे. त्यामुळे मला त्यांचा हा व्यवसाय पुढे न्यायचा आहे. पण अभिनय श्रेत्रात मी त्याच आवडीने काम करू शकणारन नाही.”

“महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये...”, धस यांचा पुन्हा हल्लाबोल
“महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये...”, धस यांचा पुन्हा हल्लाबोल.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का, महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार
पालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का, महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार.
'वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा...'; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल
'वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा...'; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली.
कराडला ICU मध्ये ठेवणारा डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात; दमानियांकडून आरोप
कराडला ICU मध्ये ठेवणारा डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात; दमानियांकडून आरोप.
VIDEO : मराठी समालोचनावरुन हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले मनसेचे नेते
VIDEO : मराठी समालोचनावरुन हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले मनसेचे नेते.
परंड्यात एसटी बसचा अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली
परंड्यात एसटी बसचा अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली.
त्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा, तृप्ती देसाईंची फडणवीसांकडे मागणी
त्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा, तृप्ती देसाईंची फडणवीसांकडे मागणी.
‘छावा’ सिनेमातील ‘तो’ सीन काढला; मंत्री उदय सामंत यांची माहिती
‘छावा’ सिनेमातील ‘तो’ सीन काढला; मंत्री उदय सामंत यांची माहिती.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; अपात्र तरी भरला अर्ज,पैसे घेणार रिटर्न?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; अपात्र तरी भरला अर्ज,पैसे घेणार रिटर्न?.