कोरोना रिपोर्ट निगेटिव्हच्या बातम्या खोट्या आणि बेजबाबदार, अमिताभ बच्चन यांचं स्पष्टीकरण
अमिताभ बच्चन यांच्या डिस्चार्जबाबत अनेक अफवा पसरवल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे (Amitabh Bachchan explain Corona report negative news false and irresponsible).
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन काही दिवसांपासून कोरोनाविरोधात लढत आहेत. त्यांची प्रकृती सध्या उत्तम आहे. मात्र, त्यांच्या डिस्चार्जबाबत अनेक अफवा पसरवल्या जात असल्याची माहिती समोर येत आहेत (Amitabh Bachchan explain Corona report negative news false and irresponsible).
अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला असून त्यांना एक-दोन दिवसात डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय काही प्रसारमाध्यमांनी याबाबत बातमीदेखील प्रकाशित केली आहे. यावर अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करुन ही बातमी खोटी, बेजबाबदार आणि अफवा असल्याचं स्पष्ट केलं (Amitabh Bachchan explain Corona report negative news false and irresponsible).
This news is incorrect, irresponsible, fake and an incorrigible lie: Actor Amitabh Bachchan on reports of him testing negative for #COVID19.
The actor was admitted to Mumbai’s Nanavati Hospital on July 11 after testing positive for the virus. pic.twitter.com/LgU4G1uW7e
— ANI (@ANI) July 23, 2020
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
अमिताभ यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती 11 जुलै रोजी रात्री उशिरा समोर आली होती. त्यांना त्याचदिवशी रात्री उशिरा उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विटरवर कोरोनाची लागण झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. त्यांच्यासह मुलगा अभिषेक बच्चनलाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोघी पितापुत्रांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे होती.
दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजेच 12 जुलै रोजी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या या दोघींमध्येही सुरुवातीला कोरोनाची लक्षणं नसल्याने त्यांना घरीच आयसोलेट करण्यात आलं होतं. मात्र, 17 जुलै रोजी या दोघींना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नानावटी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, अमिताभ यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांचं ऑक्सिजन लेव्हल आणि ब्लड प्रेशर सामान्य आहे, अशी माहिती नानावटी रुग्णालयाचे डॉक्टर अली इरानी यांनी काल (22 जुलै) दिली होती.
संबंधित बातम्या :