KBC 14: स्पर्धकाचं पत्र वाचून बिग बी झाले भावूक; व्हिडीओ व्हायरल

'कौन बनेगा करोडपती 14' च्या आगामी एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये ओडिशातील रहिवासी ज्योतिर्मयी मलिक हॉटसीटवर बसल्या आहेत. ज्योतिर्मयींच्या पत्रातील शब्द ऐकून अमिताभ बच्चनही भावूक झाले.

KBC 14: स्पर्धकाचं पत्र वाचून बिग बी झाले भावूक; व्हिडीओ व्हायरल
Amitabh BachchanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 7:50 PM

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या त्यांच्या लोकप्रिय गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या 14 (KBC 14) व्या सीझनमुळे चर्चेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बिग बी हा गेम शो होस्ट करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये एका स्पर्धकाने बिग बींसमोर पत्र वाचून दाखवलं. त्या स्पर्धकाने बिग बींसाठी हे पत्र (Letter) स्वतः लिहिलं होतं.

‘कौन बनेगा करोडपती 14’ च्या आगामी एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये ओडिशातील रहिवासी ज्योतिर्मयी मलिक हॉटसीटवर बसल्या आहेत. ज्योतिर्मयींच्या पत्रातील शब्द ऐकून अमिताभ बच्चनही भावूक झाले. ‘तुम्ही आम्हाला भावूक केलंत’ असं बिग बी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

KBC 14 मध्ये आलेल्या ज्योतिर्मयी यांनी त्यांच्या पत्रात लिहिलं, ‘माननीय अमिताभ बच्चनजी, तुम्हाला विनम्र अभिवादन. आम्ही कधी तुमच्यासारखे होऊ की नाही माहीत नाही, पण तुम्ही आमच्यापैकीच एक आहात हे सिद्ध केलात. ज्या प्रकारे तुम्ही लोकांना बसण्यासाठी खुर्ची मागे करता, एखाद्याचे अश्रू पुसता आणि टिश्यू खिशात ठेवून तुम्ही श्रोत्यांकडे जाता. कधी कधी मनात विचार येतो की असा सुपरहिरो शतकातून एकदाच होतो.’ हे ऐकून बिग बींचेही डोळे पाणावले.

काही दिवसांपूर्वीच बिग बींना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी स्वत:ची सर्व कामं स्वत: करत असल्याचं त्यांनी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. त्याचप्रमाणे स्टाफचे आभारही त्यांनी मानले होते. त्यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. तर ‘गुडबाय’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्यांच्यासोबत रश्मिका मंदाना, नीना गुप्ता आणि सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.