अभिषेक बच्चन नाही तर, ‘या’ महिलेच्या नावावर अमिताभ बच्चन यांनी केला आलिशान बंगला
कोट्यवधी रुपयांचे मालक असलेल्या अमिताभ बच्चन यांनी लेकाला नाही तर 'या' महिलेला दिली मोठी भेट... जाणून तुम्हालाही बसेल धक्का... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन आणि लेक श्वेता बच्चन - नंदा यांची चर्चा...
मुंबई | 25 नोव्हेंबर 2023 : महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या जुहू येथील आलिशाल ‘प्रतीक्षा’ बंगला मुलगा अभिषेक बच्चन याच्या नाही तर, लेक श्वेता बच्चन हिच्या नावावर केला आहे. महायनाक अमिताभ बच्चन आणि त्यांची लेक श्वेता बच्चन – नंदा यांचं नातं देखील फार खास आहे. अमिताभ बच्चन यांना अनेक ठिकाणी लेकीसोबत स्पॉट देखील केलं जातं… एवढंच नाही तर, बिग बी लेकीसोबत अनेकदा सोशल मीडियावर फोटो देखील पोस्ट करत असतात. आता देखील अमिताभ बच्चन आणि श्वेता बच्चन यांच्या नात्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. बिग बी यांनी लेकीला मोठी भेट दिली आहे . अमिताभ बच्चन यांनी लेक श्वेता बच्चन हिला ‘प्रतीक्षा’ बंगला दिला आहे. बिग बी यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे.
अमिताभ बच्चन यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे. मुंबई याठिकाणी अमिताभ बच्चन यांची कोट्यवधींची संपत्ती आहे. बिग बी यांनी लेकी दिलेले ‘प्रतीक्षा’ बंगला फार जुना असून बंगल्यात बिग बी यांच्या असंख्य आठवणी आहेत. ‘प्रतीक्षा’ बंगल्यात बिग बी त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन आणि आई तेजी बच्चन यांच्यासोबत राहायचे.
View this post on Instagram
रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांचा बंगला आता लेक श्वेता बच्चन – नंदा हिचा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी त्यांचा प्रतीक्षा बंगला त्यांची मुलगी श्वेता हिला भेट म्हणून दिला आहे. बंगली लेकीच्या नावावर करण्यासाठी बिग बी यांनी 50.65 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईतील जुहू येथे अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ या बंगल्याची किंमत 50.63 कोटी रुपये आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन आणि त्यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याची चर्चा सुरु आहे. सांगायचं झालं तर, संपत्तीची वाटणी दोन्ही मुलांमध्ये करेल… असं वक्तव्य अमिताभ बच्चन यांनी एक मुलाखतीत केलं होतं.
अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचं नाव ‘प्रतीक्षा’ का ठेवलं?
अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचं ‘प्रतीक्षा’ का आहे… यामागचं कारण बिग बी यांनी ‘कोन बनेगा करोडपती’ शोमध्ये सांगितलं होतं. या बंगल्याचं नाव वडील हरिवंश राय यांनी ठेवलं आहे. याचं बंगल्यात अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचं देखील लग्न झालं आहे.