रस्त्यावर खाल्ली चाट-पापडी, कापले केस.. अमिताभ यांच्या नातीच्या साधेपणानं जिंकली चाहत्यांची मनं

अमिताभ बच्चन यांच्या नातीचा साधेपणा पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले "तोकडे कपडे घालणाऱ्या स्टारकिड्सपेक्षा.."

रस्त्यावर खाल्ली चाट-पापडी, कापले केस.. अमिताभ यांच्या नातीच्या साधेपणानं जिंकली चाहत्यांची मनं
Navya Naveli NandaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 10:10 AM

भोपाळ: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सध्या मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये फिरण्याचा आनंद घेतेय. नव्याने तिच्या या भोपाळ ट्रिपमधील काही खास फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नव्याने भोपाळमधील काही प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली आणि त्याचसोबत सर्वसामान्यांप्रमाणे रस्त्यावरील चाट-पापडीचाही आस्वाद घेतला. तिचे हे फोटो पाहून नेटकरी तिच्या साधेपणाच्या प्रेमात पडले.

नव्या नवेली नंदा हे नाव जितकं मोठं आहे तितकंच डाऊन-टू-अर्थ तिचं व्यक्तीमत्त्व आहे. याच कारणामुळे तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. नुकतीच तिने भोपाळला भेट दिली. याचे फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले. या फोटोंमध्ये ती सफरीचा पूर्ण आनंद लुटताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

नव्या बहुतांश वेळी मेकअपविना पहायला मिळते. पांढऱ्या रंगाचा टॉप आणि ट्राऊजर आणि त्यावर काळ्या रंगाचा कार्डिगन असा तिचा साधा लूक आहे. मात्र हाच साधेपणा नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे.

नव्याने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने भोपाळच्या मार्केटपासून ते गल्ल्यांपर्यंतची झलक दाखवली आहे. चाट, भेळ, पकोडे आणि मिरची अशा स्ट्रीट फूडचा तिने आस्वाद घेतला. एका फोटोमध्ये ती रस्त्यावरील एका दुकानात केस कापताना दिसतेय.

नव्याच्या या फोटोंवर चाहत्यांसह तिची खास मैत्रीण अनन्या पांडे आणि आई श्वेता बच्चन यांनीसुद्धा कमेंट्स केल्या आहेत. ‘तू अत्यंत विनम्र वाटतेस, अशीच राहा’, असं एका युजरने लिहिलं. तर काहींनी तिला भोपाळमधल्या आणखी काही स्ट्रीट फूड्सचा आस्वाद घेण्याचा सल्ला दिला. ‘स्टारकिड असून तू इतरांपेक्षा खूप वेगळी आहेस. तोकडे कपडे घालणाऱ्या त्या इतर स्टारकिड्सपेक्षा तुझा साधेपणा खूप जास्त आकर्षित करतो’, असंही दुसऱ्या युजरने म्हटलंय.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.