Navya Naveli Nanda | ‘तो फक्त पैशांच्या मागे’; बिग बींच्या नातीसोबत अभिनेत्याला पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी केलं जोरदार ट्रोल

'अखेर सत्य समोर आलंच' असं एकाने लिहिलं. तर 'हा मुलगा फक्त पैशांच्या मागे आहे' अशी टीका दुसऱ्या युजरने सिद्धांतवर केली. 'नव्याला आणखी चांगला बॉयफ्रेंड भेटू शकतो' असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

Navya Naveli Nanda | 'तो फक्त पैशांच्या मागे'; बिग बींच्या नातीसोबत अभिनेत्याला पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी केलं जोरदार ट्रोल
Navya Naveli NandaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 9:23 AM

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाचा सोशल मीडियावर वेगळाच चाहतावर्ग आहे. इतक्या मोठ्या कुटुंबातून असूनही नव्याचा साधेपणा, तिचा नम्र स्वभाव नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतो. नव्या ही इतर स्टारकिड्सपेक्षा खूपच वेगळी असल्याचं मत अनेकांनी मांडलंय. सध्या नव्या तिच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. मुंबई विमानतळावर तिला एका बॉलिवूड अभिनेत्यासोबत पाहिल्यानंतर दोघांच्या डेटिंगच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाल्याचे कमेंट्स नेटकरी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्याच अभिनेत्यासोबत नव्याच्या डेटिंगच्या चर्चा होत आहे. अखेर दोघांना एकत्र पाहिल्यानंतर व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

नव्या नवेली नंदाला मुंबई एअरपोर्टवर अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत पाहिलं गेलं. हे दोघं रविवारी संध्याकाळी गोव्याहून परत येत होते. याआधीही दोघांच्या डेटिंगच्या चर्चा होत्या. त्यामुळे आता या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं नेटकरी म्हणत आहेत. नव्या ही अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा आणि व्यावसायिक निखिल नंदा यांची मुलगी आहे.

हे सुद्धा वाचा

नव्या आणि सिद्धांतच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘अखेर सत्य समोर आलंच’ असं एकाने लिहिलं. तर ‘हा मुलगा फक्त पैशांच्या मागे आहे’ अशी टीका दुसऱ्या युजरने सिद्धांतवर केली. ‘नव्याला आणखी चांगला बॉयफ्रेंड भेटू शकतो’ असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. सिद्धांतने ‘गली बॉय’, ‘गेहराईयाँ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 2019 मध्ये त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्याआधी त्याने ‘लाइफ सही है’ आणि ‘इनसाइड एज’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम केलं होतं.

पहा व्हिडीओ

एका मुलाखतीत सिद्धांतला डेटिंगविषयी प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “मी कोणाला तरी डेट करतोय, ही बाब खरी असावी अशी माझीसुद्धा इच्छा आहे.” सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर केलेल्या कमेंट्समुळे सिद्धांत आणि नव्या डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली होती. काही महिन्यांपूर्वी नव्या एका हिल स्टेशनला फिरायला गेली होती. त्यावेळी तिने छतावर बसल्याचा फोटो पोस्ट केला होता. ‘चंद्राने फोटो काढला’, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं होतं. तर दुसरीकडे सिद्धांतनेही त्याचा एक फोटो पोस्ट केला होता.

सिद्धांतच्या फोटोवर नव्याने सूर्याचा इमोजी पोस्ट करत कमेंट केली होती. सिद्धांतने ऋषीकेशमधील काही व्हिडीओसुद्धा पोस्ट केले होते. या व्हिडीओमध्ये ज्या छतावर नव्या बसली होती, तसंच दृश्य नेटकऱ्यांनी पाहिलं. ‘अपना मन और मून दोनो क्लिअर’, असं कॅप्शन सिद्धांतने व्हिडीओला दिलं होतं. या सर्व गोष्टींचा अंदाज बांधत नेटकऱ्यांनी नव्या आणि सिद्धांतच्या रिलेशनशिपवरून कमेंट्स करायला सुरुवात केली होती. या दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरु झाल्यानंतर नव्याने तिच्या फोटोवरील कमेंट एडिट केलं आणि सिद्धांतच्या फोटोवरील तिची कमेंट डिलिट केली होती.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.