अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्यने कथित गर्लफ्रेंडसोबत साजरा केला बर्थडे; कोण आहे ती प्रसिद्ध स्टारकिड?

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाच्या वाढदिवसाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या कथित गर्लफ्रेंडसोबत दिसून येत आहे. 'द आर्चीस' या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यापूर्वी खासगी आयुष्यामुळे तो चर्चेत आला आहे.

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्यने कथित गर्लफ्रेंडसोबत साजरा केला बर्थडे; कोण आहे ती प्रसिद्ध स्टारकिड?
Amitabh Bachchan, Agastya NandaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 23, 2023 | 2:53 PM

मुंबई : 23 नोव्हेंबर 2023 | बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आज आपला 23 वा वाढदिवस साजरा करतोय. अगस्त्य हा बिग बींची मुलगी श्वेता नंदा आणि निखिल नंदा यांचा मुलगा आहे. लवकरच तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र पदार्पणापूर्वीच अगस्त्य त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अगस्त्यचं नाव याआधीही इंडस्ट्रीतल्या सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या स्टारकिडसोबत जोडलं गेलंय. त्याच स्टारकिडसोबत मिळून अगस्त्यने वाढदिवसाचा केक कापला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

झोया अख्तरच्या ‘द आर्चीस’ या चित्रपटातून अगस्त्य बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याच चित्रपटातील त्याचा सहकलाकार मिहिर अहुजाने बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. याच फोटोंमध्ये अगस्त्य त्याच्या कथित गर्लफ्रेंडसोबत केक कापताना दिसून येतोय. ही कथित गर्लफ्रेंड आहे शाहरुख खानची मुलगी सुहाना खान. बर्थडे सेलिब्रेशनच्या आणखी एका व्हिडीओमध्ये अगस्त्य केक कापत असून त्याच्या बाजूला सुहाना उभी असल्याचं पहायला मिळतंय. यावेळी दोघांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Mihir Ahuja (@mihirahuja_)

सुहानाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये अगस्त्यसोबतचा जुना फोटो पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर हे तिघं ‘द आर्चीस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. झोया अख्तरने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात मिहिर अहुजा, युवराज मेंडा आणि वेदांग रैना यांच्याही भूमिका आहेत. येत्या 7 डिसेंबर रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टारकिड्सच्या यादीत समाविष्ट असलेली शाहरुख खानची मुलगी सुहाना नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. मात्र त्याआधीच तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. पापाराझींची तिच्यावर खास नजर असते. तर दुसरीकडे अगस्त्यसोबतच्या नात्यामुळेही तिने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. सेटवरही दोघं एकमेकांसोबत बराच वेळ घालवायचे. इतरांपासूनही ही गोष्ट लपली नव्हती. ख्रिसमस पार्टीच्या निमित्ताने अगस्त्यने कुटुंबीयांसमोर हे नातं ‘ऑफिशिअल’ करण्याचं ठरवलं होतं, अशीही चर्चा होती.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.