Amitabh Bachchan Health : अपघातानंतर अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

अपघाताच्या अनेक दिवसांनंतर बिग बींच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट करत व्यक्त केली 'ही' इच्छा... चाहत्यांना चिंता करण्याचं कारण....

Amitabh Bachchan Health : अपघातानंतर अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 10:38 AM

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांचा हैदराबाद याठिकाणी ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना अपघात झाला आहे. वयाच्या ८० व्या वर्षी ॲक्शन सीन शुट करताना बिग बींचा अपघात झाला आहे.बिग बींच्या अपघाताची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर चाहते चिंता व्यक्त करत आहेत. अपघातानंतर बिग बी यांच्या बरगड्यांना दुखापत झाल्याची माहिची समोर आली. ६ मार्च रोजी खुद्द बिग बींनी अपघात झाल्याची माहिती चाहत्यांनी दिली. आता अनेक दिवसांनंतर बिग बी यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. नुकताच बिग बी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःच्या प्रकृतीची माहिती चाहत्यांना दिली आहे. शिवाय चाहत्यांसमोर एक इच्छा देखील व्यक्त केली आहे.

बिग बी यांचा अपघात झाला तेव्हा, त्यांना श्वास घेण्यासाठी देखील त्रास होत असल्यामुळे शुटिंग रद्द करण्यात आली आहे. सध्या अभिनेते त्यांच्या मुंबई येथील जलसा बंगल्यावर आराम करत आहेत. डॉक्टरांनी बिग बींना काही आठवडे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. आता जोपर्यंत बिग बींची प्रकृती पूर्ण ठिक होत नाही, तोपर्यंत त्यांचं काम आणि शुटिंग बंद राहणार आहे. पण आता बिग बींनी चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर बिग बी यांनी स्वतःचा एक जुना फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये बिग बी रॅम्प वॉक करताना दिसत आहेत. रॅम्प वॉक करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी काळ्या रंगाचा कुर्ता-पायजामा घातला आहे. सध्या त्यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

स्वतःचा जुना फोटो शेअर करत बिग बींनी त्यांची इच्छा व्यक्त केली असून, प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. ‘तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी आभारी आहे. मी आचा ठिक होत आहे. लवकरच रॅम्पवर पदार्पण करण्याची इच्छा आहे.’ असं बिग बी कॅप्शनमध्ये म्हणाले. बिग बींची पोस्ट पाहून चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

बिग बीच्या अपघातानंतर ‘प्रोजेक्ट K’सिनेमावर मोठं संकट आलं आहे. सिनेमात बिग बींसोबत अभिनेता प्रभास, दीपिका पादुकोण, दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘प्रोजेक्ट K’ सिनेमाची शुटिंग २०२१ मध्ये सुरु झाली. पण कोरोना असल्यामुळे सिनेमाचं शुटिंग पूर्ण होवू शकलं नाही. आता बिग बी जखमी झाल्यामुळे सिनेमाचं शुटिंग थांबलं आहे.

‘प्रोजेक्ट K’ सिनेमा ५०० रुपयांच्या बजेटमध्ये साकारण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’सिनेमा भारतातील सर्वांत जास्त बजेट असलेला सिनेमा असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’सिनेमा १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या बिग बी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.