Amitabh Bachchan Birthday : बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे बचावले अमिताभ बच्चन यांचे प्राण; ‘ती’ घटना होती थक्क करणारी

Amitabh Bachchan | धक्कादायक घटनेनंतर अमिताभ बच्चन यांच्या मदतीसाठी धावून आले होते बाळासाहेब ठाकरे; 'ती' घटना होती थक्क करणारी... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांची चर्चा रंगत आहे. कारण आज बिग बी यांचा वाढदिवस आहे.

Amitabh Bachchan Birthday : बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे बचावले अमिताभ बच्चन यांचे प्राण; 'ती' घटना होती थक्क करणारी
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 2:49 PM

मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : ‘मूछें हों तो नत्थूलाल जी जैसी हों, वर्ना न हों!!’, ‘डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है’, ‘डॉन का इंतजार तो ग्यारह मुल्कों की पुलिस कर रही है।” यांसारख्या असंख्य डायलॉगमुळे महानायक अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज बिग बी यांचा वाढदिवस आहे. म्हणून चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. बिग बी यांच्याबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ते वर्षातून दोन वेळा वाढदिवस साजरा करतात. अमिताभ बच्चन त्यांचा पहिला वाढदिवस ११ ऑक्टोबर रोजी तर दुसरा वाढदिवस २ ऑगस्ट रोजी साजरा करतात. ज्यामागे कारण देखील फार मोठं आहे.

अमिताभ बच्चन यांच्या दुसऱ्या वाढदिवसाबद्दल सांगायचं झालं तर, १९८२ मध्ये बिग बी यांना दुसरं आयुष्य मिळालं. तेव्हा अमिताभ बच्चन एका मोठ्या अपघातातून बचावले होते. ‘कुली’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला होता. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.

अपघातानंतर बिग बी यांची प्रकृती प्रचंड गंभीर होती. तेव्हा मुंबईतील वातावरण ठिक नव्हतं. अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत रुग्णवाहिका पोहोचू शकत नव्हती. अशात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बिग बी यांच्या मदतीला धावून आले. रुग्णवाहिका मिळत नसताना बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचवली आणि अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

त्या धक्कादायक अपघातानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या मदतीमुळे अमिताभ बच्चन यांचे प्राण वाचले. रिपोर्टनुसार, अपघातानंतर दोन महिने बिग बी रुग्णालयात दाखल होते. तेव्हा रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर बिग बी म्हणाले होते, ‘मृत्यू आणि जीवन यांच्यामधील भयानक अग्निपरीक्षा होती. दोन महिन्यांचा रुग्णालयातील प्रवास आणि मृत्यूशी झुंज आता संपली आहे. मृत्यूवर विजय मिळवून घरी परतत आहे…’ आज सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांची चर्चा रंगली आहे.

अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, आजपर्यंत बॉलिवूडमध्ये बिग बी यांची जागा कोणताही अभिनेता घेवू शकला नाही. आजही मोठ्या पडद्यावर बिग बी यांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सोशल मीडियावर देखील कायम अमिताभ बच्चन यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

एवढंच नाही तर, सोशल मीडियाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन चाहत्यांसोबत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. बिग बी कायम त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटन सोशल मीडिया आणि ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आज अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असल्यामुळे जगभातील चाहते त्यांच्या शुभेच्छा देत आहेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.