Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांनी केले मोठे भाष्य, म्हणाले, वय वाढल्याने लोकही आता
बाॅलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे नेहमीच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या कायमच संपर्कात असतात. अनेकदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही अमिताभ बच्चन हे दिसतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी वयाबद्दल मोठे भाष्य केले आहे.
मुंबई : अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असलेले एक नाव आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. इतकेच नाही तर अमिताभ बच्चन हे अजूनही चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही (Social media) नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अमिताभ बच्चन हे दिसतात. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये चक्क अमिताभ बच्चन हे एका चाहत्यासोबत गाडीवर फिरताना दिसले होते. याचा व्हिडीओ (Video) पाहूनही चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता.
चक्क चाहत्यासोबत गाडीवर फिरताना अमिताभ बच्चन हे दिसले होते. मात्र, चाहत्यासोबत गाडीवर फिरणे अमिताभ बच्चन यांना चांगलेच महागात पडले होते. कारण गाडीवर फिरताना हेल्मेट न घातल्याने अमिताभ बच्चन यांना दंड पोलिसांकडून आकारण्यात आला होता. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी पोलिसांच्या गाडी बाहेरील एक फोटो शेअर केला.
नुकताच अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, वय झाल्याने आता लोकांनी माझा मजाक उडवणे सोडले आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लाॅगमध्ये लिहिले की, आता लोक विचार करतात की, 81 वर्षांचा म्हातारा झाला आहे. म्हातारा कमजोर झाला आहे. त्याला सहन करू शकतो आणि हे सगळे किती दिवस चालणार आहे.
विशेष म्हणजे कमेंट्स सुद्धा तशाच येतात… बिचारा, तो बिनडोक माणूस आहे… त्याला जाऊद्या… आता अमिताभ बच्चन यांनी केलेले हे विधान चर्चेत आहे. म्हणजे वय झाल्याने लोकांनी आता त्यांचा मजाक उडवणे बंद केल्याचे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. सध्या अमिताभ बच्चन हे त्यांच्या आगामी सेक्शन 84 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.
काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांचा उंचाई हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट चार मित्रांच्या मैत्रीवर आधारित होता. विशेष म्हणजे उंचाई या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद हा देखील मिळाला. उंचाई चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनुपम खेर हे देखील मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने धमाल केली.