ऐश्वर्याच्या लिपस्टिकमुळे बच्चन कुटुंब अडचणीत, अमिताभ यांना..
ऐश्वर्या राय हिने मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही सध्या तिच्या आणि अभिषेक बच्चनच्या नात्यामुळे चर्चेत आहे. सतत याबद्दल अत्यंत मोठे खुलासे हे होताना दिसत आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे त्यांच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत दिसत आहेत. हेच नाही तर सतत यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा बघायला मिळत आहे. काही रिपोर्टनुसार ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील वाद इतका जास्त वाढला आहे की, ऐश्वर्या राय हिने थेट अभिषेक बच्चन याचे घर सोडले आहे. ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या हिच्यासोबत तिच्या आईच्या घरी शिफ्ट झालीये. एका कार्यक्रमात ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन पोहचले होते. मात्र, दोघेही वेगवेगळ्या गाडीने आल्याचे बघायला मिळाले.
ऐश्वर्या राय हिच्याकडे दुर्लक्ष करताना अभिषेक बच्चन हा दिसला. इतकेच नाही तर अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर ऐश्वर्या राय हिने अनफाॅलो केले आहे. मात्र, एकेकाळी एका मोठ्या वादात अमिताभ बच्चन हे ऐश्वर्या राय हिच्या मागे खंबीरपणे उभे होते. आता हे दोघेही एकमेकांना सोशल मीडियावर फाॅलो देखाील करत नाहीत.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील वादामुळे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यामध्ये देखील दुरावा आल्याचे सांगितले जाते. ऐश्वर्या राय हिने जांभळ्या रंगाची लिपस्टिक लावल्यामुळे जोरदार वाद निर्माण झाला. ऐश्वर्या राय हिला सतत सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. लोकांना ऐश्वर्या राय हिची ही स्टाईल अजिबातच आवडली नाही.
या वादावर एक मुलाखतीमध्ये अमिताभ बच्चन यांनी थेट म्हटले होते की, जांभळ्या रंगाच्या लिपस्टिकमध्ये काय वाईट आहे. सोशल मीडिया अभिव्यक्तीला स्वातंत्र्य देते. हे सर्वकाही सोशल मीडियावर सुरूच असते. एक दोन दिवसांमध्ये वेगळा विषय येईल. आता अमिताभ बच्चन यांच्या या मुलाखतीची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
ऐश्वर्या राय हिला अभिषेक बच्चन हे मुलीसारखे मानतात. मात्र, असे असतानाही ऐश्वर्या राय हिने अमिताभ बच्चन याचे घर कसे सोडले याचीच चर्चा ही रंगताना दिसत आहे. मात्र, अजूनही ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर बच्चन कुटुंबियांकडून काहीच भाष्य हे करण्यात नाही आले. मात्र, यांच्या सततच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळत आहे.