Amitabh Bachchan | बिग बीचा ‘जलसा’, अपघातानंतर अमिताभ बच्चन यांच्याकडून हात उंचावत चाहत्यांना अभिवादन

अपघातानंतर अमिताभ बच्चन पहिल्यांदा चाहत्यांसमोर.... ॲक्शन सीन शुट करताना झाली होती गंभीर दुखापत... अनेक दिवसांनंतर बिग बी यांना पाहिल्यानंतर चाहते आनंदी..

Amitabh Bachchan | बिग बीचा 'जलसा', अपघातानंतर अमिताभ बच्चन यांच्याकडून हात उंचावत चाहत्यांना अभिवादन
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 11:29 AM

मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. बिग बी यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील आहे. अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेले अमिताभ बच्चन आजही चाहत्यांचे फेव्हरेट आहेत. बिग बींची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अशात बिग बी देखील कधी चाहत्यांना नाराज करत नाहीत. नुकताच अमिताभ बच्चन यांनी ‘जलसा’ बंगल्याबाहेरून चाहत्यांना हात उंचावत अभिनवादन केलं. काही दिवसांपूर्वी सिनेमात ॲक्शन सीन शुट करताना अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला होता. त्यानंतर चाहते बिग बीच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत प्रार्थना करत होते. आता खु्द्द बिग बी समोर दिसल्यानंतर चाहत्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

बिग बी यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात, शिवाय तासंतास प्रतीक्षेत देखील उभे राहतात. सध्या बिग बींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ४ जून रोजी बिग बी बंगल्याबाहेर चाहत्यांच्या भेटीसाठी आले. अपघातानंतर बिग बी दिसल्यामुळे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. व्हिडीओवर बिग बींचे चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

हे सुद्धा वाचा

अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, बिग बी लवकरच ‘प्रोजेक्ट के’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सिनेमाचं शुटिंग सुरु आहे. ‘प्रोजेक्ट K’ सिनेमा ५०० रुपयांच्या बजेटमध्ये साकारण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’सिनेमा भारतातील सर्वांत जास्त बजेट असलेला सिनेमा असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’सिनेमा १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगत आहे.

सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनन, दीपिका पादुकोण, दिशा पाटनी आणि साऊथ सुपस्टार प्रभास देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मल्टी स्टारर ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाची शुटींग हैदराबाद येथील फिल्म सीटी येथे सुरु आहे.

सिनेमांशिवाय अमिताभ बच्चन लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ च्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या भोटीस येणार आहे. शोसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. मोठ्या पडद्याशिवाय अमिताभ बच्चन सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. सोशल मीडिया आणि ब्लॉगच्या माध्यमातून अमिताभ बच्चन कायम त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.