नाती बनतायत-बिघडतायत..; अभिषेक-करिश्माच्या मोडलेल्या साखरपुड्यावर काय म्हणाले बिग बी?

दिग्दर्शक सुनील दर्शन यांच्या ‘हां मैने भी प्यार किया’ या चित्रपटासाठी दोघांनी सोबत काम केलं होतं. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुनील यांना अभिषेक-करिश्मामधली जवळीक स्पष्ट दिसू लागली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि त्याचसोबत अभिषेक-करिश्माचं नातंसुद्धा संपुष्टात आलं.

नाती बनतायत-बिघडतायत..; अभिषेक-करिश्माच्या मोडलेल्या साखरपुड्यावर काय म्हणाले बिग बी?
Amitabh and Abhishek Bachchan and Karisma KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 12, 2024 | 11:15 AM

गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंब सतत सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. एकीकडे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा होत्या. तर दुसरीकडे जया बच्चन यांनी संसदेतील त्यांच्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलंय. अशातच अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते अभिषेक आणि करिश्मा कपूर यांच्या मोडलेल्या साखरपुड्याबद्दल दु:ख व्यक्त करताना दिसत आहेत. एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. इतकंच नव्हे तर या दोघांनी साखरपुडासुद्धा केला होता, असं म्हटलं जातं. मात्र लग्नाआधीच या दोघांचं नातं तुटलं. कपूर आणि बच्चन कुटुंबीयांमध्ये खास नातेसंबंध सुरू होण्याआधीच सर्वकाही संपुष्टात आलं होतं.

अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमधील आहे. या शोमध्ये करण त्यांना अभिषेक आणि करिश्माच्या साखरपुड्याविषयी प्रश्न विचारतो. “कुटुंबासाठी ती वेळ फार कठीण होती का?”, असा सवाल करण बिग बींना करतो. त्यावर ते म्हणतात, “ते अत्यंत नाजूक क्षण होते. नाती बनत होत्या आणि बिघडत होत्या. कोणत्याही व्यक्तीसाठी हे सर्व सहन करणं खूप कठीण असतं. जर परिस्थिती तुमच्यासाठी ठीक नसेल तर मार्ग वेगळे करण्यातच तुमचं भलं असतं.”

हे सुद्धा वाचा

बच्चन कुटुंबीयांनी तर एका पत्रकार परिषदेत करिश्माचा उल्लेख ‘होणारी सून’ असा केला होता. जया बच्चन यांनी एका पत्रकार परिषदेत करिश्माचा उल्लेख ‘माझी होणारी सून’ असा केला होता. माध्यमांसमोर त्यांनी करिश्मा आणि अभिषेकचं लग्न जाहीर केलं होतं. यावेळी मंचावर संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होतं. या घटनेच्या बऱ्याच वर्षांनंतर दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या तुटलेल्या नात्याविषयी खुलासा केला होता. अभिषेक आणि करिश्माने 2000 मध्ये जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचलेल्या या दोघांचा साखरपुडासुद्धा झाला होता. मात्र त्यानंतर त्याचं नातं तुटलं.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.