दहा बाय दहाच्या खोलीत 8 जणांसोबत राहिलो, महिन्याचा पगार फक्त…; बिग बींनी दिला संघर्षाच्या दिवसांना उजाळा

स्ट्रगलिंगच्या काळात 8 जणांसोबत छोट्या खोलीस राहायचे अमिताभ बच्चन; सांगितला मित्रांसोबतचा किस्सा

दहा बाय दहाच्या खोलीत 8 जणांसोबत राहिलो, महिन्याचा पगार फक्त...; बिग बींनी दिला संघर्षाच्या दिवसांना उजाळा
Amitabh BachchanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 1:32 PM

मुंबई: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची श्रीमंती जगजाहीर आहे. आज त्यांच्याकडे आलिशान बंगले, गाड्या आणि सर्व सुविधा उपलब्ध आहेत. मात्र एक काळ असा होता जेव्हा ते छोट्याशा खोलीत आठ जणांसोबत राहायचे. त्यावेळी त्यांचा पगार फक्त 1640 रुपये इतका होता. याचा खुलासा खुद्द बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये केला. बिग बी विविध विषयांवर ब्लॉग लिहित त्यात आपल्या भावना व्यक्त करतात तर कधी जुने किस्से सांगतात. नुकत्याच लिहिलेल्या ब्लॉगमध्ये त्यांनी संघर्षाच्या दिवसांना उजाळा दिला आहे.

कोलकातामधल्या ब्लॅकर्स कंपनीत 30 नोव्हेंबर 1968 हा त्यांच्या कामाचा शेवटचा दिवस होता, असं त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिलंय. ती फाइल त्यांनी आजपर्यंत सांभाळून ठेवली आहे.

‘कलकत्तामधील (आता कोलकाता) ते दिवस.. फ्री.. फ्रीडम.. फ्रीइस्ट.. ते स्वतंत्रपणे, मुक्तपणे जगण्याचे दिवस होते. आठ लोक दहा बाय दहाच्या खोलीत राहायचो. मित्रांनो, ते सुद्धा काय दिवस होते! काम संपल्यावर मित्रांसोबत फिरायला जायचं, लोकप्रिय हॉटेल्सच्या आत जाण्यासाठी आमच्याकडे पैसे नसायचे. मात्र बाहेरच या आशेनं उभे राहायचो की एक दिवस आम्ही नक्कीच आत जाऊ आणि आम्ही हे करून दाखवलं’, अशा शब्दांत त्यांनी आठवणींना उजाळा दिला.

हे सुद्धा वाचा

‘आम्ही आत गेलो, गेट कीपर्सना खूप विनंती केली. जेव्हा आमची वेळ चांगली असेल तेव्हा तुमची काळजी घेऊ असं त्यांना म्हणायचो. हाहाहा.. असं कधी झालं नाही’, असं त्यांनी पुढे लिहिलं.

अभिनयविश्वात पदार्पण केल्यानंतर सर्वच गोष्टी बदलल्याचं त्यांनी या ब्लॉगमध्ये म्हटलंय. ‘जेव्हा नवीन प्रोजेक्ट मिळाला आणि शूटिंगसाठी शहरात जाऊ लागलो तेव्हा त्याच जागी जायचो. आता ते मेजवानी देतात आणि असा हा झालेला बदल.. त्या लोकांची झालेली भेट’, असं ते म्हणाले.

अमिताभ बच्चन हे ट्विटर आणि ब्लॉगच्या माध्यमातून सतत चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यांचा ‘उंचाई’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मैत्रीवर आधारित असलेल्या या चित्रपटात त्यांनी अनुपम खेर, बोमन इराणी, परिणिती चोप्रा, नीना गुप्ता यांच्यासोबत काम केलं.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.