Aishwarya Rai | ‘आराध्यासारखं वागणं बंद कर’; सर्वांसमोर सून ऐश्वर्यावर का ओरडले अमिताभ बच्चन?

बिग बींनी फटकारल्यानंतरही ऐश्वर्या त्याकडे गंभीरतेने पाहत नाही आणि त्यांची पुन्हा मस्करी करते. या दोघांचा हा व्हिडीओ बराच जुना आहे. मात्र तो सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Aishwarya Rai | 'आराध्यासारखं वागणं बंद कर'; सर्वांसमोर सून ऐश्वर्यावर का ओरडले अमिताभ बच्चन?
Aishwarya Rai and Amitabh BachchanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 1:04 PM

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर सोशल मीडियावर तिचे बरेच व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले. यातील एका फोटोमध्ये ती आणि अभिनेता सलमान एकाच फ्रेममध्ये दिसले. त्यानंतर नेटकऱ्यांनी या दोघांचे काही गमतीशीर व्हिडीओसुद्धा एडिट केले. यादरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाचीही जोरदार चर्चा होती. ऐश्वर्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. ज्यामध्ये ती पती अभिषेकशी भांडताना दिसत होती. आता इंटरनेटवर तिचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तिचे सासरे म्हणजेच अमिताभ बच्चन हे तिला फटकारताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर ते तिच्या वागण्याची तुलना आराध्याशी करताना दिसतायत.

या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यातील खास बाँडींगसुद्धा पहायला मिळतेय. मात्र ऐश्वर्या कॅमेरासमोर असं काही करते, ज्यानंतर बिग बी तिला फटकारतात. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या बरीच ओरडत असते. बिग बींना ती मिठी मारते आणि म्हणते की ते बेस्ट आहेत. त्यावर अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पहायला मिलतं. तेव्हाच ते तिला म्हणतात, “आराध्यासारखं वागणं बंद कर.”

पहा व्हिडीओ

This is hard to watch no matter how many times you’ve seen it by u/okay177 in BollyBlindsNGossip

हे सुद्धा वाचा

बिग बींनी फटकारल्यानंतरही ऐश्वर्या त्याकडे गंभीरतेने पाहत नाही आणि त्यांची पुन्हा मस्करी करते. या दोघांचा हा व्हिडीओ बराच जुना आहे. मात्र तो सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. काहीजण या दोघांमधील बाँडींगचं कौतुक करत आहेत. तर काहीजण ऐश्वर्याचं वागणं पाहून तिला ट्रोल करत आहेत. ‘कजरा रे या गाण्याची आठवण झाली’, असं एकाने लिहिलं. तर ‘परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन कुठे आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. एका युजरने असंही लिहिलं आहे, ‘तुमच्या निष्काळजीपणाचा परिणाम पाहिलात का?’

ऐश्वर्या लवकरच ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये दिसणार आहे. तर अमिताभ बच्चन यांना ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली. गेल्या काही दिवसांपासून ते घरीच आराम करत आहेत. सोशल मीडियावरील ब्लॉगद्वारे ते चाहत्यांना त्यांच्या तब्येतीविषयीचे अपडेट्स देत असतात.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.