Amitabh Bachchan : ‘आम्ही आणखी एकाला गमावलं…’, अपघातानंतर बिग बींची पोस्ट चर्चेत
अपघातानंतर सोशल मीडियाच्या मध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहणारे महानायक म्हणाले, 'आम्ही आणखी एकाला गमावलं...', पोस्ट लिहिताना का भावुक झाले बिग बी?
Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन यांचा हैदराबाद याठिकाणी ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना अपघात झाला आहे. अपघातानंतर बिग सध्या त्यांच्या राहत्या घरी आराम करत आहेत. पण अमिताभ बच्चन सोशल मीडियाच्या माध्यामातून संपर्क साधत असतात. खु्द्द अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून अपघाताची माहिती दिली. आता पुम्हा बिग बी यांनी ब्लॉग लिहीत दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं आहे. सध्या अमिताभ बच्चन यांनी सतीश यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना चहात्यांमध्ये चर्चेत आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर चाहते आणि सेलिब्रिटींच्या मनात मोठी पोकळी तयार झाली आहे.
सतीश यांच्या निधनानंतर ब्लॉगमध्ये बिग बी म्हणाले, ‘आम्ही आणखी एकाला गमावलं आहे. एक उत्तम व्यक्ती, उत्तम अभिनेता ज्याने स्वतःचं करियर यशाच्या उच्च शिखरावर नेलं…. सतीश कौशिक… तुमच्यासोबत काम करणं प्रचंड प्रेरणादायी होतं. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं… मी प्रार्थना करतो…’ सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अमिताभ बच्चन आणि सतीश कौशिक यांनी १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘बडे मिया छोटे मिया’ सिनेमात एकत्र काम केलं. सिनेमात सतीश यांनी शराफत अली या भूमिकेला न्याय दिला. त्यांनी प्रेक्षकांना पोट धरुन हासवलं. शिवाय सतीश कौशिक यांनी बिग बींच्या ‘हम किसी से कम नही’ सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका बजावली. आजही सतीश कौशिक यांच्या सिनेमांची चर्चा रंगलेली असते.
बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सतीश कौशिक यांनी अनेक चढ – उतार पाहिले. सुरुवातील आलेल्या अपयशानंतर सतीश पूर्णपणे खचले. पण ‘मिस्टर इंडिया’ सिनेमातील ‘कॅलेंडर’ या भूमिकेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. ८० – ९० च्या दशकातील मुलं सतीश कौशिक यांना कधीही विसरु शकत नाहीत. अभिनेयात यश मिळाल्यानंतर कौशिक यांनी दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला.
‘या’ सिनेमांच सतीश कौशिक यांनी केलं दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी 1993 मध्ये रूप की रानी चोरों का राजा’ या सिनेमातून दिग्दर्शनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘बधाई हो बधाई’ यांसारख्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. शिवाय कंगना रनौत हिच्या ‘इमरजेन्सी’ सिनेमाचं दिग्दर्शन देखील कौशिक यांनी केलं आहे. सिनेमा कौशिक यांच्या निधनानंतर प्रदर्शित होणार आहे. शिवाय ‘गन्स एन्ड गुलाब’ सतीश कौशिक यांचा शेवटचा वेब शो ठरणार आहे.