अमिताभ बच्चन यांनी शेअर केला रेखा यांच्यासोबतचा फोटो; म्हणाले ‘या फोटोमागे मोठी..’

अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहाणी तर जगजाहीर आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत एकेकाळी या दोघांच्या लव्ह-स्टोरीची जोरदार चर्चा होती. या दोघांमध्ये सिक्रेट प्रेम होतं, असं म्हटलं जातं. अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी मोठ्या पडद्यावर एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला रेखा यांच्यासोबतचा फोटो; म्हणाले 'या फोटोमागे मोठी..'
Amitabh Bachchan and RekhaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 11:28 AM

मुंबई : 23 जानेवारी 2024 | बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे त्यांच्या ब्लॉगद्वारे विविध गोष्टी, किस्से, आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. इंडस्ट्रीत 50 वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलेल्या बिग बींनी नुकताच एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री रेखा, राज कपूर, विनोद खन्ना, संगीत दिग्दर्शक कल्याण, रणधीर कपूर, मेहमूद आणि शम्मी कपूर पहायला मिळत आहेत. 70 च्या दशकातील एका कार्यक्रमातील हा फोटो आहे. या फोटोमागे मोठी कहाणी असल्याचं त्यांनी म्हटलंय. बिग बी आणि रेखा यांचं नातं जगजाहीर होतं. त्यामुळे त्यांनी रेखा यांच्यासोबत फोटो पोस्ट करताच नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या.

या फोटोमध्ये स्टेजवर उभे असलेले अमिताभ बच्चन हे एका हातात माइक घेऊन दुसऱ्या हाताने अभिवादन करताना दिसत आहेत. तर त्यांच्या बाजूला उभे असलेले सेलिब्रिटी टाळ्या वाजवत आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासोबत मंचावर विनोद खन्ना, संगीत दिग्दर्शक कल्याण, राज कपूर, रणधीर कपूर, मेहमूद, रेखा आणि शम्मी कपूर पहायला मिळत आहेत. अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तर रेखा यांनी साडी नेसली होती. शम्मी कपूर यांनी हिरव्या रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा घातला होता. इतर सेलिब्रिटी काळ्या कपड्यांमध्ये दिसून आले. हा फोटो शेअर करत बिग बींनी लिहिलं, ‘आणि.. आह.. या फोटोग्राफमागे खूप मोठी कहाणी आहे. एकेदिवशी ती सांगितली पाहिजे.’ यासोबतच त्यांनी भुवया उंचावलेला इमोजी पोस्ट केला.

पहा फोटो

हे सुद्धा वाचा

मुलगा अभिषेक बच्चनसोबत मुंबईहून अयोध्येला निघण्याच्या काही तास आधी त्यांनी हा फोटो शेअर केला होता. बिग बी आणि अभिषेक हे दोघं अयोध्येत श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी गेले होते. मंदिराच्या आवाराज अमिताभ बच्चन यांनी ‘रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर भाजप खासदार रविशंकर प्रसाद आणि उद्योगपती अनिल अंबानी यांचीही त्यांनी भेट घेतली.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी मोठ्या पडद्यावर एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटांमध्ये एकत्र काम करतानाच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. अमिताभ यांनी प्रेमाची जाहीर कबुली कधीच दिली नाही. 1976 मध्ये ‘दो अंजाने’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांना डेट करू लागले, असं म्हटलं जातं. त्याकाळी सर्व वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये अमिताभ आणि रेखा यांच्या कथित प्रेमप्रकरणाच्या बातम्या झळकत होत्या.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.