KBC 15 : अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती 15’ कुठे आणि कधी पाहता येणार?
अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती 15' शोबद्दल मोठी अपडेट समोर, कुठे आणि कधी पाहता येणार शो?... सध्या सर्वत्र बिग बी यांच्या 'कौन बनेगा करोडपती 15' शोची चर्चा
मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. फक्त सिनेमेच नाही तर, ‘कौन बनेगा करोडपती’ या रिऍलिटी शोच्या अनेक भागांमधून देखील बिग बी यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती 15’ शोमुळे चर्चेत आहेत. शोमध्ये अमिताभ बच्चन यांचं हिंदी भाषेवर असलेलं प्रभुत्व पाहण्यासाठी देखील प्रेक्षक ‘कौन बनेगा करोडपती’ शोची प्रतीक्षा करत असतात. आता देखील ‘कौन बनेगा करोडपती 15’ शोच्या माध्यमातून स्पर्धक आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये प्रश्न -उत्तरांचा खेळ रंगणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ शोच्या होस्टची जबाबदारी सांभाळत आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ शोचा १५ वा सीझन १४ ऑगस्ट पासून सुरु झाला आहे. प्रेक्षकांना ‘कौन बनेगा करोडपती 15’ सीझन सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर रात्री ९ वाजता पाहता येणार आहे. सध्या सर्वत्र ‘केबीसी’ शोची चर्चा रंगत आहे.
‘कौन बनेगा करोडपती १५’ शोच्या टीमने एक शोमध्ये बदलांबाबत एक निवेदन जारी केलं आहे. ‘KBC 15’ मध्ये आणखी पर्याय असणार आहे. ज्याचं नाव ‘सुपर संदूक’ असं आहे. यामुळे स्पर्धकांनी अचूक उत्तर देण्यास मदत होणार आहे. सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन यांच्या ‘कोन बनेगा करोडपती १५’ शोची चर्चा रंगली आहे.
‘व्हान्ट्स टू बी अ मिलियनेअर ?’ या टॅगलाईनच्या आधारावर गेली अनेक वर्ष ‘केबीसी’ शोच्या माध्यमातून अनेकांनी श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहिलं आहे. २००० मध्ये ‘केबीसी’ शोची सुरुवात झाला. तेव्हापासून शोच्या होस्टची जबाबदारी अमिताभ बच्चन यांच्या खांद्यावर आहे. फक्त ‘केबीसी’ शोचा तिसरा सीझन अभिनेता शाहरुख खान याने होस्ट केला होता.
‘कोन बनेगा करोडपती १५’बद्दल अमिताभ बच्चन म्हणाले, ‘कोन बनेगा करोडपती कायम ज्ञानदार, शानदार आणि धनदार ठरला आहे… पण १५ व्या सीझनच्या माध्यमातून आम्ही नवी सुरुवात करणार आहोत. नव्या भारताचं प्रतिनिधित्व करणार आहोत…’ असं देखील बिग बी म्हणाले. सध्या सर्वत्र ‘कोन बनेगा करोडपती १५’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.