World Cup 2023 : असं असेल तर अमिताभ बच्चन यांनी वर्ल्ड कपची फायनल पाहूच नये?

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी सामना पाहिल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला बसतो मोठा फटका? बिग बी यांच्या पोस्टमुळे सर्वत्र खळबळ... एका सोशल मीडियामुळे अमिताब बच्चन चर्चेत.... बिग बी यांच्या पोस्टनंतर चाहते देखील त्यांना म्हणाले...

World Cup 2023 : असं असेल तर अमिताभ बच्चन यांनी वर्ल्ड कपची फायनल पाहूच नये?
अमिताभ बच्चन
Follow us
| Updated on: Nov 16, 2023 | 9:39 AM

Amitabh Bachchan : वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने 70 धावांनी विजय मिळवला आहे. आता वर्ल्ड कप फायनलकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सेमी फायनलमध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी केल्यामुळे सर्वच स्तरातून भारतीय क्रिकेटपटूंचं कौतुक होत आहे. फक्त चाहते नाही तर, सेलिब्रिटी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटपटूंवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. पण बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांच्या ट्विटनंतर मात्र अनेकांना धक्का बसला आहे. सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा दारुन पराभव केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. एक्सवर बिग बी म्हणाले, ‘मी जेव्हा सामना पाहात नाही, तेव्हा आपण जिंकतो!’ अमिताभ बच्चन यांच्या एक्सवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिला आहे.

एक नेटकरी म्हणाला, ‘यंदाचा सामनावीर तुम्हालाच मिळल सर…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सर तुम्ही सामना पाहिला नाहीत बरं झालं.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘फक्त एक गोष्ट म्हणजे आपण जिंकले पाहिजे आणि आपण नेहमीच जिंकतो…’ सध्या सर्वत्र फक्त वर्ल्ड कप आणि अमिताभ बच्चन यांच्या एक्सची चर्चा रंगत आहे.

एवंढच नाही तर, अमिताभ बच्चन यांना सामना पाहिला नाही तर, आपण जिंकत असू तर, त्यांनी वर्ल्ड कपची फायनल पाहूच नये? अशी देखील चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे. अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं मत व्यक्त करत असतात.

सांगायचं झालं तर, भारत आणि न्यझीलंडमध्ये झालेल्या सेमी फायनल सामना पाहण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी वानखेडे स्टेडीयमवर पोहोचले होते. किआरा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, शाहीद कपूर, मीरा राजपूत, विकी कौशल, रणबीर कपूर, जॉन अब्राहम, कुणाल खेमू, सोहा अली खान, अनुष्का शर्मा.. यांसारखे कलाकार सेमा फायनल पाहाण्यासाठी पोहोचले होते.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.