अभिषेकसाठी अमिताभ बच्चन यांची लांबलचक पोस्ट, ‘अच्छे ने अच्छा और, बुरे ने बुरा…’
Amitabh Bachchan on Son: 'अच्छे ने अच्छा और, बुरे ने बुरा...', मुलगा अभिषेक बच्चन याच्यासाठी बिग बींची लक्षवेधी पोस्ट, सध्या सर्वत्र बिग बींच्या पोस्टची चर्चा..., अमिताभ बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत...
Amitabh Bachchan on Son: दिग्दर्शक शुजीत सरकार दिग्दर्शित ‘आय वॉन्ट टू टॉक’ सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. सिनेमात अभिनेता अभिषेक बच्चन यांने मुख्य भूमिका साकारली आहे. सध्या सर्वत्र सिनेमाच्या कथेची चर्चा सुरु आहे. एका बाप-लेकीच्या आयुष्याभोवती फिरणारी सिनेमाची कथा सध्या चर्चेत असली तरी, बॉक्स ऑफिसवर सिनेमा फेल ठरला आहे. अशात महानायक अमिताभ बच्चन यांनी मुलगा अभिषेक बच्चन याच्यासाठी खास ब्लॉग लिहिला आहे. सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन यांनी लिहिलेल्या ब्लॉगची चर्चा सुरु आहे.
ब्लॉगच्या माध्यमातून बिग बी म्हणाले, ”काही सिनेमे तुमच्या मनोरंजनासाठी येतात… काही सिनेमे तुम्हाला सिनेमे बनवण्यासाठी आमंत्रित करतात. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, हा सिनेमा तुम्हाला सिनेमे बनवण्यासाठी आमंत्रित करत आहे… सिनेमा तुम्हाला खुर्चीतून हळूच उठायला लागतो आणि तेवढ्याच हळू चित्रपटगृहात घेऊन जातो… सिनेमा सोडून पळण्याची इच्छा देखील होणार नाही… अभिषेक… तू अभिषेक नाही…. तर तू सिनेमातील अर्जुन सेन आहेस…’
View this post on Instagram
पुढे वडील हरिवंश राय बच्चन यांच्या काही ओळी सांगत बिग बी म्हणाले, ‘ने अच्छा और, बुरे ने बुरा जाना मुझे, जिसकी जितनी जरूरत थी, उसने उतना ही पहचाना मुझे… पण त्यांना जे काही बोलयाचं आहे बोलूदे… असं मी सांगेल…
‘माझ्यातील चांगल्यासाठी लोभ असू शकतो. तुमची हाव वाईट देखील असू शकते… पण चांगला विचार करणं किंवा वाईट विचार करणं ही तुझी ‘गरज’ होती.. आणि हीच माझी ओळख होती.. तुम्ही एखाद्याबद्दल चांगला विचार करत असाल तर ती तुमची गरज आहे… जर तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करत असाल, तर तुमची गरज तुमच्या पर्यंत आहे… तुमची चांगली आणि वाईट गरज… हा विचार होता… असं देखील बिग ही म्हणाले.
अभिषेक बच्चन याच्या ‘आय वॉन्ट टू टॉक’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाचा बजेट 30 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 25 लाख रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 55 लाख रुपयांची कमाई केली. तिसऱ्या दिवशी सिनेमाने 50 लाख रुपयांचा गल्ला जमा केला. म्हणजे तीन दिवसांच सिनेमाने 1.30 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.