बिग बींवर लागला होता दंगल भडकवल्याचा आरोप, श्री अकाल तख्त साहिबला लिहिलेले जुने पत्र व्हायरल!

अलीकडेच कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे मदतीसाठी अमिताभ बच्चन यांनी दिल्लीच्या गुरुद्वारा रकब गंज साहिब येथे कोव्हिड केअर सेंटर उभारण्यासाठी 2 कोटी रुपये दान दिले आहेत.

बिग बींवर लागला होता दंगल भडकवल्याचा आरोप, श्री अकाल तख्त साहिबला लिहिलेले जुने पत्र व्हायरल!
अमिताभ बच्चन
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 5:00 PM

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे गेले अनेक दिवस कोरोना पीडितांसाठी सतत देणगी देत ​​आहेत. अलीकडेच कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे मदतीसाठी अमिताभ बच्चन यांनी दिल्लीच्या गुरुद्वारा रकब गंज साहिब येथे कोव्हिड केअर सेंटर उभारण्यासाठी 2 कोटी रुपये दान दिले आहेत. ज्यानंतर आता एक पत्र व्हायरल होत आहे. पंजाबमधील राजकारणही यामुळे चांगलेच तापले आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर 1984च्या शीख हत्याकांड (1984 शीख दंगली) दरम्यान दंगल भडकवल्याचा आरोप केला होता. परंतु या संपूर्ण प्रकरणावर बिग बींनी 10 पूर्वी एक पत्र लिहून आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. बिग बींचे हे पत्र आता इंटरनेटवर व्हायरल झाले आहे (Amitabh Bachchan wrote a letter after he blames for shikh riots in 1984).

2011मध्ये अमिताभ बच्चन यांनी आपले हे पत्र श्री अकाल तख्त साहिबच्या जत्थेदारांना पाठवले होते. या पत्रात अमिताभ यांनी लिहिले की, ‘शीख हत्याकांडात जमावाला भडकावणारे माझ्यावर लागलेले हे सर्व आरोप चुकीचे आहेत.’ हे स्पष्टीकरण त्यांनी आपल्या पत्रात दिले होते. अमिताभ बच्चन यांनी श्री अकाल तख्त साहिब यांना हे पत्र मुंबईत राहणाऱ्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे सदस्य गुरिंदरसिंग बावा यांच्यामार्फत पाठवले होते.

पाहा पत्र :

या पत्राद्वारे अमिताभ बच्चन यांनी असे लिहिले आहे की, त्यांना शीख समुदायाला कोणतीही इजा पोहचवायची नाही आणि स्वप्नातही ते याबद्दल कधीही विचार करू शकत नाही. त्यामुळे माझ्यावर लागलेले हिंसा भडकवणारे सर्व आरोप खोटे आहेत (Amitabh Bachchan wrote a letter after he blames for shikh riots in 1984).

काय म्हणाले अमिताभ बच्चन

‘बिग बीं’ना सोशल मीडियावर शीखविरोधी म्हटले जात आहेत. 1984च्या शीख हत्याकांडात अमिताभ बच्चन यांच्यावर अनेक मोठ्या आरोपांचा सामना करावा लागला होता. शेवटी दुःखी होत त्यांनी एक पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी असे लिहिले आहे की, जेव्हा खालसा पंथ यांचे जन्मस्थान श्री आनंदपूर साहिब येथे खालसा हेरिटेज कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनप्रसंगी जेव्हा त्यांना बोलावण्यात आले तेव्हा त्यांनी पंजाब सरकारचे आमंत्रण स्वीकारले, परंतु तेथे पोहोचले नाहीत कारण त्यांनी त्यांनाही वादाचे कारण व्हायचे नव्हते.

त्यानंतर त्यांनी या पत्रात सांगितले होते की, माझा विश्वास आहे, गांधी आणि नेहरू कुटूंबाशी आमचे जुने संबंध आहेत, ते आपल्या आनंदात आणि दु:खात एकत्र आले आहेत, परंतु असेही नाही की, मी एखाद्याच्या विरोधात बोलतो. किंवा चुकीच्या घोषणा देतो. माझा असा कोणताही हेतू नव्हता. यामुळेच हिंसाचाराला प्रवृत्त करण्याचा आरोप खोटा आहे.

(Amitabh Bachchan wrote a letter after he blames for shikh riots in 1984)

हेही वाचा :

भूतानचा माजी सैनिक संगय शेल्ट्रिम सलमानचा चाहता, थेट मिळवली ‘राधे’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका!  

Photo : दाक्षिणात्य कलाकारांसोबत जवळीक वाढवतेय कंगना रनौत, इन्स्टाग्रामवर केलं समंथाचं कौतुक

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.