‘ती आता लहान राहिलेली नाही…’, अमिताभ बच्चन यांची लक्षवेधी पोस्ट कोणासाठी?

Amitabh Bachchan : अभिषेक - ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अमिताभ बच्चन यांची लक्षवेधी पोस्ट; म्हणाले, 'ती आता लहान राहिलेली नाही...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बिग बी यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा...

'ती आता लहान राहिलेली नाही...', अमिताभ बच्चन यांची लक्षवेधी पोस्ट कोणासाठी?
Follow us
| Updated on: Dec 17, 2023 | 10:39 AM

मुंबई | 17 डिसेंबर 2023 : बच्चन कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण आता अभिषेक – ऐश्वर्या यांचं नातं नाही तर दोघांची लेक सर्वत्र चर्चेत आली आहे. अभिषेक – ऐश्वर्या यांची लेक आराध्या बच्चन सध्या तिचं शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आराध्या शिक्षण घेत आहे. नुकताच शाळेचा एनुअल डे कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. सोशल मीडियावर सध्या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहेत.

शाळेच्या एनुअल डे कार्यक्रमात अभिषेक – ऐश्वर्या यांची लेक आराध्या हिने भन्नाट सादरीकरण केलं. आराध्या हिच्या सादरीकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील आराध्या हिचं सादरीकरण प्रचंड आवडलं. नातीला स्टेजवर पाहून महानायक अमिताभ बच्चन यांना देखील मोठा आनंद झाला.

हे सुद्धा वाचा

अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होतात. आता देखील बिग बी यांनी नातीसाठी लक्षवेधी पोस्ट लिहिली आहे. ‘लवकरच तुम्हाला सर्वांना पुढे भेटेल. सध्या आराध्या हिच्या शाळेच्या एनुअल डे कार्यक्रमात व्यस्त आहे. सर्वांसाठी गर्व आणि आनंदाचा क्षण आहे. स्टेजवर आराध्या अगदी नॅचरल दिसते… छोटीशी मुलगी आता लहान राहिलेली नाही…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आराध्या हिच्या अभिनयाची चर्चा रंगली आहे.

नात आराध्या बच्चन हिला अभिनय करताना पाहून आजोबा अमिताभ बच्चन यांना प्रचंड आनंद झाला आहे. नातीवर बिग बी यांना अभिमान वाटत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर अनेकांनी आराध्या हिला उत्तम अभिनेत्री… असं देखील म्हटलं आहे.

सांगायचं झालं तर, आराध्या स्टेजवर अभिनय करत होती, तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेली ऐश्वर्या लेकीच्या आयुष्यातील अमुल्य क्षण तिच्या कॅमेऱ्यात टिपत होती. आराध्या हिला कायम आई ऐश्वर्या हिच्यासोबत स्पॉट केलं जातं. ऐश्वर्या कायम सोशल मीडियावर लेकीसोबत फोटो पोस्ट करत असते.

आराध्या लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. 2007 मध्ये अभिषेक याच्यासोबत लग्न केल्यानंतर ऐश्वर्या हिने 2011 मध्ये लेक आराध्या हिला जन्म दिला. अनेक ठिकाणी ऐश्वर्या लेक आराध्या हिच्यासोबत पोहोचते.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.