“त्याची चव अप्रतिम असते”, अमिताभ बच्चन यांना आवडतो ‘हा’ चमचमीत मराठमोळा पदार्थ

अमिताभ बच्चन हे आजही त्यांच्या खाण्याच्या बाबतीत फार काटेकोर आहेत. पण असं असतानाही ते एका पदार्थापुढे त्यांचं डाएटही विसरतात. कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात त्यांनी आपल्या आवडत्या पदार्थाबद्दल सांगितलं.

त्याची चव अप्रतिम असते, अमिताभ बच्चन यांना आवडतो 'हा' चमचमीत मराठमोळा पदार्थ
Follow us
| Updated on: Oct 22, 2024 | 12:39 PM

Amitabh Bachchan’s Favorite Food: बिग बी अमिताभ बच्चन यांचे अनेक किस्से प्रसिद्ध होत असतात. अमिताभ बच्चन हे कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंगाना उजाळा देत असतात. स्पर्धकांच्या आयुष्यातील प्रसंग ऐकता ऐकता आपल्या संघर्षाच्या काळातील गोष्टीही सांगत असतात. अमिताभ बच्चन अनेक वर्षापासून महाराष्ट्रात राहतात. अनेक मराठी अभिनेते त्यांचे मित्र आहेत. त्यांच्या घरी येणंजाणंही असतं. अमिताभ बच्चन यांना मराठी पदार्थही खूप आवडतात. त्यात वडापाव म्हटलं की मराठी माणसांचा विक पॉईंट. तुम्हाला माहितीये बिग बींना सुद्धा वडापाव हा अत्यंत आवडतो.

कौन बनेगा करोडपती 16च्या सीजनमध्ये गुजरात येथील एक कला, शिल्प आणि संगीत शिक्षिका हर्षा उपाध्याय सहभागी झाल्या होत्या. त्यांच्याशी अमिताभ बच्चन यांनी खेळादरम्यान खूप गप्पा मारल्या. अमिताभ यांच्याशी यावेळी खाण्यावर चर्चा रंगल्या. तुम्हाला चुरमा आवडतो का? असा सवाल जेव्हा हर्षा यांनी अमिताभ यांना विचारला. त्यावर अमिताभ यांनी हसत हसत उत्तर दिले. भलेही मी सर्व पदार्थांची चव घेतली नसेल पण एक स्नॅक्स मला खूप आवडते. ते म्हणजे वडापाव, असं अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.

वडापावसारखा पदार्थच नाही वडापाव सारखा पदार्थच नाही. त्यापेक्षा चांगला पदार्थ असूच शकत नाही. अत्यंत छोटा आहे, पण अत्यंत भारी आहे. प्रत्येक ठिकाणी वडापाव मिळतो. देशातच नाही तर विदेशातही वडापाव मिळतो, असं अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.

आणि दारू सोडली

अमिताभ यांचा दारू सोडल्याचा किस्साही अधूनमधून व्हायरल होत असतो. अमिताभ बच्चन यांचा सात हिंदुस्तानी हा सिनेमा आला होता. त्यावेळचा हा किस्सा आहे. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी सिनेमाचे निर्माते ख्वाजा अहमद अब्बास हे अत्यंत कमी बजेटमध्ये सिनेमा बनवायचे. जेव्हा ते खूश व्हायचे तेव्हा आपल्यासोबत काम करणाऱ्यांना 50 रुपये देऊन जा मजा करा, असं म्हणायचे. एकदा हे 50 रुपये अमिताभ यांना मिळाले. त्यांनी पार्टी करायचं ठरवलं. जलाल आगा आणि अन्वर अली यांच्यासोबत अमिताभ यांनी पार्टी करण्याचा निर्णय घेतला. तिघेही प्रचंड दारू प्यायले.

दुसऱ्या दिवशी अनवर अली हे अमिताभ यांच्याकडे आले. त्यांनी अमिताभ यांना मोलाचा सल्ला दिला. जोपर्यंत तुझं फिल्म इंडस्ट्रीत नाव होत नाही, तुला लोकप्रियता मिळत नाही, तोपर्यंत दारूला हात लावू नकोस, असं अन्वर अली यांनी अमिताभ यांना सांगितलं. त्या दिवसापासून अमिताभ यांनी दारूला हात न लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आयुष्यभर दारूला हात लावला नाही. फक्त लहान भाऊ अजिताभ यांच्या लग्नाच्यावेळी त्यांनी फक्त दोन घोट घेतल्याचेही सांगितले.

Non Stop LIVE Update
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.